महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे चाहते जगभर पसरले आहेत. या चाहत्यांमध्ये रविवारी एका टेनिस दिग्गजाची भर पडली. सार्वकालिन महान टेनिसपटू रॉजर फेडररने भारतीय संघाची जर्सी घालून संघाला पाठिंबा दिला. भारतीय क्रिकेट संघाप्रमाणेच फेडररच्या किटचेही प्रायोजक ‘नाईके’ आहे.
‘‘जंटलमन्स गेमसाठी भारतीय संघाची जर्सी परिधान करून सज्ज होत आहे. ब्लीड ब्ल्यू!’’ अशा शब्दांत फेडररने ‘फेसबुक’च्या माध्यमातून आपला पाठिंबा व्यक्त केला. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळत असताना फेडरररुपी मातब्बर चाहता लाभल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला. काही तासांतच भारतीय संघाने विजयासह विश्वचषक अभियानाची दणक्यात सुरुवात केली. तब्बल १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणारा फेडरर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चाहता आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय चाहत्यांचे प्रेम अनुभवणाऱ्या फेडररने क्रिकेटप्रेमाची व्याप्ती भारतीय संघापर्यंत वाढवली आहे.
धोनी सेनेच्या चाहत्यांमध्ये फेडररही
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे चाहते जगभर पसरले आहेत. या चाहत्यांमध्ये रविवारी एका टेनिस दिग्गजाची भर पडली.
First published on: 16-02-2015 at 02:38 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roger federer supported team india