टीम इंडियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीसाठी सज्ज होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सराव शिबीरात माजी फिरकीपटू शेन वॉर्नने उपस्थिती लावली. भारतीय संघाच्या आर.अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्यासमोर आपले भंबेरी उडू नये यासाठी हरहुन्नरी माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज शेन वॉटसनने सराव केला. गुरूवारी रंगणारी विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी सिडनी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पारंपारिकरित्या सिडनीची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी ठरते. याच पार्श्वभूमीवर शेन वॉर्नच्या फिरकी माऱयावर फलंदाजी करण्याचा सराव यावेळी शेन वॉटसनने केला.

Story img Loader