(शिखर धवनसारखा मिशीला पीळ देत चंपक तोताराम दरबारी येतो)
चंपक : मूँछों का कमाल है सब!
तोताराम : अगदीच. आयसीसीची स्पर्धा म्हटली की मिशाळजींना चेव चढतो.
चंपक : रोहित शर्माने शतकाचा ‘मौका’ वाया घालवला. तुम्ही म्हणालात तसं आर्यलड फिरकीच्या जाळ्यात अडकले.
तोताराम : अहो त्यांना चांगल्या दर्जाच्या फिरकीसमोर खेळण्याचा अनुभवच नाही. त्यामुळे होतं असं. सुरेश रैनाही त्यांच्यासाठी मोठा फिरकीपटू.
चंपक : आपण सुसाट चाललोय, जिंकायचं ठरवलंय आपण तुम्ही सांगता तसं.
तोताराम : मी किंवा विठ्ठलपंत सांगतो म्हणून नाही. त्यांनी चंग बांधलाय चांगलं खेळण्याचा, म्हणून होतंय.
चंपक : श्रीलंका सरशी साधणार ना स्कॉटलंडवर.
(विठ्ठलपंत गडद निळ्या रंगाचं कार्ड हाती देतात)
तोताराम : श्रीलंका जिंकेल मात्र खरी समस्या वेगळीच आहे. त्यांना हवीत फिट माणसं. साथ आल्यासारखी प्रत्येक मॅचमध्ये माणसं दुखापतग्रस्त होत आहेत त्यांची. कसं आहे राखीव मंडळी असतात पण दूर श्रीलंकेतून ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये यायला वेळ लागतो. आल्यावर जेटलॅग वगैरे. पूर्णफिट ११ माणसं अप्रूप आहे त्यांच्यासाठी. संगकारा पेटलाय एकदम. मलिंगाला चमकण्याची संधी आहे. रंगना हेराथ फिट झाला तर धमाल येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा