आतापर्यंत अडखळत खेळणाऱ्या श्रीलंकेला जर उपांत्यपूर्व फेरीचे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर त्यांना गुरुवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मोठय़ा फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. दुसरीकडे बांगलादेशचा संघही बाद फेरीत पोहोचण्यासाठी उत्सुक असून त्यांच्यासाठी हा विजय महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
श्रीलंकेचा संघ कागदावर नक्कीच बलाढय़ आहे. त्यांच्याकडे कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान आणि महेला जयवर्धनेसारखे नावाजलेले फलंदाजांचे त्रिकूट आहे. पण महेलाचा अपवाद वगळता अन्य दोघांना अजूनही सूर गवसलेला नाही. गोलंदाजीमध्येही श्रीलंकेला अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अफगाणिस्थानसारख्या नवख्या संघाने श्रीलंकेला चांगलेच दमवले होते. त्यामुळे त्यांचा सध्याचा फॉर्म नक्कीच चांगला नाही.
बांगलादेशने आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. शकिब अल हसन, तमीम इक्बाल यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार मश्रफी मुतर्झाने संघाची चांगली बांधणी केली आहे. झिम्बाब्वेचे माजी गोलंदाज हिथ स्ट्रीक यांनी संघाच्या गोलंदाजीला चांगला आकार दिला आहे.
दोन्ही संघांचा विश्वचषकातील कामगिरीचा विचार करता श्रीलंकेपेक्षा बांगलादेशने नक्कीच दमदार कामगिरी केली आहे. पण श्रीलंकेसारखे अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे हा सामना नक्कीच चुरशीचा असेल. जो संघ हा सामना जिंकेल, तो उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने
कूच करेल.
सामना क्र. : १८    श्रीलंका वि. बांगलादेश (अ-गट)
स्थळ : मेलबर्न ल्ल वेळ : सकाळी ९.००
आमने सामने
सामने : ३७ ’ श्रीलंका ३२  ’ बांगलादेश ४  ’ रद्द- १
संघ
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लहिरू थिरीमाने (उपकर्णधार), कुमार संगकारा (यष्टिरक्षक), तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने, दिनेश चंडिमल, दिमुथ करुणारत्ने, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, धम्मिका प्रसाद, न्युवान कुलसेकरा, रंगना हेराथ, सचित्रा सेनानायके.
बांगलादेश : मश्रफ मुर्तझा (कर्णधार), शकीब उल हसन (उपकर्णधार), तमिम इक्बाल, अनामुल हक बिजॉय, मोमीनुल हक, महंमदुल्लाह रियाझ, मुश्फीकर रहीम (यष्टिरक्षक), नासिर हुसेन, ताजिउल इस्लाम, ताश्किन अहमद, अल अमीन हुसेन, सौम्य सरकार, रुबेल हसन, शब्बीर रहेमान, सनी अराफत.
थेट प्रक्षेपण
सर्व स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर

Story img Loader