साखळी फेरीत दोन मानहानीकारक पराभवांनंतर सूर गवसलेल्या पाकिस्तानने बाद फेरी गाठली आहे. दुसरीकडे घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा असणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला आहे. अनपेक्षित दणका देण्यासाठी प्रसिद्ध पाकिस्तान आणि व्यावसायिक आणि सातत्यपूर्ण खेळासाठी ओळखला जाणारा ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत.
मिसबाह उल हक आणि सर्फराझ अहमद यांच्यावर पाकिस्तानच्या फलंदाजीची भिस्त आहे. उमर अकमल पाकिस्तानसाठी हुकमी एक्का आहे. अन्य फलंदाजांना कामगिरीत सातत्य आणणे आवश्यक आहे. हॅरिस सोहेल, अहमद शेहझाद यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. शाहिद आफ्रिदीने फलंदाजीत कोणतेही योगदान दिलेले नाही.
फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची उडणारी भंबेरी लक्षात घेता, यासिर शाहला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. वहाब रियाझ, सोहेल खान आणि राहत अली या त्रिकुटाने पाकिस्तानच्या विजयात सातत्याने योगदान दिले आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाला नमवायचे असेल तर या त्रिकुटाला चमकादार कामगिरी करावी लागेल.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा साखळी गटात पुरेसा सराव झालेला नाही. डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांच्याकडून दमदार सलामीची अपेक्षा आहे. मायकेल क्लार्क, स्टिव्हन स्मिथ यांना मोठी खेळी करावी लागणार आहे. ग्लेन मॅक्सवेल जबरदस्त फॉर्मात आहे. पाकिस्तानविरुद्ध आणखी एक तडाखेबंद खेळी साकारण्यासाठी तो उत्सुक आहे. अनुभवी आणि अष्टपैलू शेन वॉटसन ऑस्ट्रेलियासाठी भरवशाचा आहे. नवव्या क्रमांकांपर्यंत असलेली फलंदाजी ऑस्ट्रेलियाचे बलस्थान आहे. मात्र एका खेळाडूने खेळपट्टीवर ठाण मांडत सूत्रधाराची भूमिका निभावणे आवश्यक आहे.
मिचेल स्टार्क आणि मिचेल जॉन्सन लौकिकाला साजेशी कामगिरी करत आहेत. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड या दोघांमध्ये अंतिम अकरात स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे. अष्टपैलू जेम्स फॉल्कनर ऑस्ट्रेलियाची ताकद आहे. साखळी गटात कमी धावसंख्येच्या रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीतील उणिवा स्पष्ट झाल्या होत्या. या कच्च्या दुव्यांवर प्रहार करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र अॅडलेड ओव्हलवर या दोन देशांदरम्यान झालेल्या सहापैकी पाच लढतीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे.
अस्सल तडका!
साखळी फेरीत दोन मानहानीकारक पराभवांनंतर सूर गवसलेल्या पाकिस्तानने बाद फेरी गाठली आहे. दुसरीकडे घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा असणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-03-2015 at 03:06 IST
Web Title: Surging pakistan prepare for dominant australia