विजयाच्या लाटेवर भारत आणि आर्यलड हे दोन्ही संघ स्वार झालेले आहेत. भारत बलाढय़ आहे, तर प्रतिस्पर्धी आर्यलडने ‘लिंबू-टिंबू’ हा शिक्का पुसलेला आहेत. भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला असला तरी आर्यलडला बाद फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. न्यूझीलंडच्या मैदानावर भारतीय संघ पहिला सामना खेळत असून ऑस्ट्रेलियातील विजयांचा सिलसिला कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर दुसरीकडे भारताला धक्का देऊन इतिहासात प्रथमच बाद फेरीत पोहोचण्यासाठी आर्यलडचा संघ
भारताने आतापर्यंतच्या चारही सामन्यांमध्ये विजय मिळवीत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. चारही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी आपली छाप पाडली आहे. मोहम्मद शमी भन्नाट फॉर्मात आहे. त्याला उमेश यादव आणि मोहित शर्मा चांगली साथ देत आहेत. आर. अश्विनची फिरकीही प्रतिस्पध्र्याना चकित करत आहे. पण या सामन्यात भुवनेश्वर कुमार आणि स्टुअर्ट बिन्नी यांना संधी मिळणार का, याची उत्सुकता असेल. फलंदाजीमध्ये रोहित शर्मा अजूनही फॉर्मात आलेला नाही आणि हीच संघासाठी मोठी चिंता असेल. शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीही आता चांगल्या फॉर्मात दिसत आहे. पण या सर्वासाठी फॉर्म फुलवण्यासाठी ही लढत म्हणजे चांगली संधी ठरू शकेल.
आर्यलडने चारपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवत सहा गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. त्यांनी या सामन्यात जर भारताला पराभूत केले तर त्यांना थेट उपान्त्यपूर्व फेरीचे दरवाजे खुले होऊ शकतात, पण या सामन्यात पराभूत झाल्यास त्यांना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची वाट पाहावी लागेल. फलंदाजीमध्ये एड जोयससारखा अनुभवी शिलेदार आहे. पॉल स्टर्लिग, केव्हिन ओ’ब्रायन, निल ओ’ब्रायनसारखे दमदार अष्टपैलू खेळाडू आहेत. तर अॅलेक्स क्युसॅकसारखा परिस्थितीला योग्य हाताळत भेदक मारा करणारा गोलंदाज आहे. बलाढय़ संघाला नमवण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते ते त्यांच्या संघात नक्कीच आहे. त्यामुळे लौकिकाला साजेसा खेळ केल्यास त्यांना भारताला धक्का देता येऊ शकतो.
दोन्ही संघ पाहिले तर नक्कीच आर्यलडपेक्षा भारतीय संघ बलाढय़ आहे आणि त्यांनाच सामना जिंकण्याची सर्वाधिक संधी आहे. पण आर्यलडने वेस्ट इंडिजला धक्का दिलेला आहे, त्याचबरोबर झिम्बाब्वेवर गेल्या सामन्यात विजय मिळवल्याने त्यांचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. त्यामुळे भारतीय संघ गाफील राहिल्यास आर्यलडला वरचढ होण्याची सुवर्णसंधी असेल.
आता ‘पंच’पक्वान्न!
विजयाच्या लाटेवर भारत आणि आर्यलड हे दोन्ही संघ स्वार झालेले आहेत. भारत बलाढय़ आहे, तर प्रतिस्पर्धी आर्यलडने ‘लिंबू-टिंबू’ हा शिक्का पुसलेला आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-03-2015 at 01:11 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india enthusiastic for 5th victory