‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है..’ मुकेश यांचे हे गाणे सध्या भारतीय क्रिकेट संघांच्या यशाचे गमक आहे. विश्वचषक स्पध्रेपूर्वी भारतीय संघाची कामगिरी ही निराशाजनक होती आणि त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती़ या खचलेल्या मानसिकतेतून संघाला बाहेर काढण्यासाठी विश्वचषक स्पर्धेप्रसंगी ड्रेसिंग रूमच्या भिंतींवर प्रेरणा देणारी चार भित्तिचित्रे लावली आहेत. त्यामुळेच भारताच्या ‘पोस्टर बॉइज’नी साखळीमधील सहापैकी सहा सामने जिंकत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
पोस्टर क्रमांक १
ड्रेसिंग रूममध्ये शिरताच महेंद्रसिंग धोनी आणि संघ एकत्र घोळका करून चर्चा करतानाचे छायाचित्र आपल्याला दिसते आणि त्यावर मुकेश यांच्या ‘जीना इसी का नाम है..’ या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत.
दुसऱ्या भित्तिचित्रात रवींद्र जडेजाने बळी घेतल्यानंतर सर्व संघाने त्याचे केलेले कौतुक दिसत आहे. ‘वारंवार काय करायचे हे आम्हाला माहीत आह़े हा कोणताही कायदा नसून तो आमचा स्वभाव आहे,’ असे यावर अधोरेखित करण्यात आले आहे.
‘कोणत्याही परिस्थितीत देव तुम्हाला एकाकी सोडत नाही़ तो तुमच्या आधी त्या परिस्थितीला सामोरे जातो़ तो तुमच्यासोबत असतो, तुमच्या मागोमाग चालतो़ त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असाल, त्याला आत्मविश्वासाने सामोरे जा, देव तुमच्यासोबत आह़े,’ असा संदेश तिसऱ्या भित्तिचित्रातून देण्यात आला आह़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा