खराब कामगिरीमुळे आपण सध्या काटेरी वाटेवरून चालत असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन याने दिली. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या विश्वचषक सामन्यात खेळण्यासाठी तो धडपडत आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात वॉटसनला भोपळाही फोडता आला नव्हता. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर त्याची कामगिरी निराशाजनक होत आहे. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्याला स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. वाईट कामगिरी होत असल्याची कबुली वॉटसनने दिली.

Story img Loader