संयुक्त अरब अमिराती संघाने १९७६ मध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स संघाविरुद्ध सामना खेळला होता. मात्र त्या वेळी पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यांच्याकडे क्रिकेटला चालना मिळाली ती शारजा येथे १९८४मध्ये
अमिराती क्रिकेट मंडळाची १९८९मध्ये स्थापना झाली व लगेचच त्यांना आयसीसीचे सदस्यत्व मिळाले. १९९०मध्ये त्यांच्या राष्ट्रीय संघाची स्थापनाही करण्यात आली. केनियात १९९४मध्ये झालेल्या आयसीसी स्पर्धेत चांगली कामगिरी व्हावी यासाठी त्यांनी भारत, पाकिस्तान व श्रीलंकेतील अनेक खेळाडूंना भरपूर आर्थिक मोबदला व गलेलठ्ठ पगाराची नोकरीची हमी देत आपल्या देशात खेळण्यास निमंत्रित केले. १९९६ मध्ये त्यांनी आयसीसी चषक जिंकला व विश्वचषक स्पर्धेची पात्रता पूर्ण केली. त्या वेळी त्यांच्या संघाचा कर्णधार सुलतान झारावनी याचा अपवाद वगळता अन्य सर्व खेळाडू आयात केलेले खेळाडू होते. आखाती देशातील संघांचे आव्हान असणाऱ्या या संघाने १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेची मुख्य फेरी गाठली होती. त्या वेळी त्यांनी नेदरलँड्स संघावर एकतर्फी विजय मिळविला होता. या स्पर्धेतील त्यांचा हा एकमेव विजय आहे. या विजयाच्या आधारे त्यांनी बारा संघांमध्ये अकरावे स्थान मिळविले होते. त्यानंतर त्यांना २०११पर्यंत या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविता आलेले नाही. यंदाच्या स्पर्धेसाठी गतवर्षी झालेल्या पात्रता स्पर्धेत त्यांनी उपविजेतेपद मिळवीत मुख्य फेरीचे स्वप्न पुन्हा साकार केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा