२०११ मध्ये सचिन तेंडुलकर विश्वचषकाचे आकर्षण होता. सचिनने विश्वविजेतेपदासह क्रिकेटविश्वाला अलविदा केला. चार वर्षांनंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या नावाची जादू काय किमया करू शकते याचा प्रत्यय मेलबर्न क्रिकेट मैदानावर आला. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकल्यानंतर अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल मैदानात टेलिव्हिजन वाहिनीला मुलाखत देत होता. इतक्यात सचिन तेंडुलकर बाजूने चालत जात असल्याचे मॅक्सवेलला दिसले आणि त्याचे चक्क सुरू असलेली मुलाखत सोडून थेट सचिनची गळाभेट घेण्यासाठी धाव घेतली. सचिनची भेट घेऊन त्वरित मॅक्सवेल पुन्हा मुलाखतीसाठी कॅमेरासमोर दाखल झाला.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढतीला सचिन उपस्थित होता. प्रत्येक वेळी मैदानावर मोठय़ा पडद्यावर सचिन झळकताच प्रेक्षकांमध्ये जल्लोषाची लाट पसरत होती. सचिनच्या हस्तेच सामनावीर जेम्स फॉकनर आणि मालिकावीर मिचेल स्टार्क यांना पुरस्कार देण्यात आले. निवेदक मार्क निकोलस यांनी सचिनचे नाव उच्चारताच ९० हजारपेक्षा जास्त चाहत्यांनी सचिनच्या नावाचा जयघोष केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा