ख्रिस गेलची खराब कामगिरी पाहून नाराज चाहत्याने केलेले ‘ट्विट’ वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या प्रमुखांनी पाहिले आणि थोडय़ाच वेळात ‘रिट्विट’ केले. हे ‘रिट्विट’ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गेल पाकिस्तानविरुद्ध ४ धावांवर बाद झाला. त्यावेळी ‘‘गेल परतला, मोठी खेळी न करता. आता त्याला स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देण्याची वेळ आली आहे!,’’ अशा शब्दांत विंडीजच्या चाहत्याने निराशा व्यक्त केली. विंडीज क्रिकेट मंडळाचे प्रमुख डेव्ह कॅमेरून यांनी सामना सुरू असतानाच हे ‘रिट्विट’ केले. त्यांचे हे वर्तन अयोग्य असल्याची तक्रार विंडीजच्या खेळाडूंच्या संघटनेने केली आहे. कॅमेरून यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असे त्यांनी सांगितले.
गेलच्या निवृत्तीचे ‘रिट्विट’ महागात पडले!
ख्रिस गेलची खराब कामगिरी पाहून नाराज चाहत्याने केलेले ‘ट्विट’ वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या प्रमुखांनी पाहिले आणि थोडय़ाच वेळात ‘रिट्विट’ केले.
First published on: 23-02-2015 at 04:00 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies chief blasted for chris gayle retirement retweet