तोताराम : गेल म्हणजे चक्रीवादळ आहे. त्या मार्सियापेक्षा डेंजर. अमानवी वाटेल असा खेळतो.
चंपक : एक्झ्ॉक्टली. सुरुवातीला निवांत होता. मग पार सोलूनच काढलं.
तोताराम : चंपकशेठ एक लक्षात घ्या. चक्रीवादळ सारखं सारखं येत नाही. लहरीपणा हे त्याचं वैशिष्टय़. पुढच्या सामन्यात शून्यावर स्वारी तंबूत असेल.
चंपक : तुम्ही बुवा फारच निगेटिव्ह राव. आज छप्पर फाड के रन केल्यात ना. बास्स ना, उद्याचं कोणी पाहिलंय.
तोताराम : आम्ही तेच तर पाहतो.
(विठ्ठलपंत अर्ध हिरवं-अर्ध जांभळं असं कार्ड देतात.)
तोताराम : आर्यलड जिंकणार. यांना जिंकायला आवडतं. त्यासाठी मेहनत करायलाही ते तयार असतात. ओ’ब्रायन बंधूंप्रमाणे एड जोयस, पॉल स्टर्लिग कामाची माणसं. अॅण्डी बलर्बिनीची ऊर्जा चैतन्यमयी. अमिरातीविरुद्ध दणदणीत विजय मिळवला तर आर्यलडला उपांत्यपूर्व फेरीचे दार उघडू शकते.
चंपक : अफगाणिस्तान-स्कॉटलंड?
तोताराम : कट्टर होईल मॅच. टाइमपास मॅच म्हणून लोक म्हणतील पण ही मॅच पाहण्यासारखी होईल. एकांगी मॅच नसेल.
चंपक : आता तुम्ही म्हणताय म्हणून पाहीन. पळतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा