विश्वचषक स्पर्धेतील सलगच्या दोन पराभवांमुळे पाकिस्तान संघाच्या एका नाराज चाहत्याने थेट पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाच आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे.
पाकिस्तानला विश्वचषकात सलामीच्या सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी भारतीय संघाविरोधात ७६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तर, दुसऱया सामन्यात वेस्ट इंडिजने पाकला तब्बल १५० धावांनी धूळ चारली. सलगच्या दोन मोठ्या पराभवांमुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाचे वातवरण आहे. अशाच एका नाराज चाहत्याने न्यायालयात धाव घेत विश्वचषकातील पाकिस्तान संघाच्या वाईट कामगिरीबाबत तपास करण्याची मागणी केली आहे. त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, भारताविरुद्धच्या पराभवाचे पाकिस्तानमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी या पराभवानंतर संतप्त होऊन घरातील टेलिव्हिजन सेट्स फोडून आपला पाकच्या पराभवाची नाराजी व्यक्त केली होती.
विश्वचषकात सलग दोन पराभवांमुळे पाकच्या पंतप्रधानांविरोधात याचिका!
विश्वचषक स्पर्धेतील सलगच्या दोन पराभवांमुळे पाकिस्तान संघाच्या एका नाराज चाहत्याने थेट पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाच आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-02-2015 at 11:34 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup petition filed against pakistans poor performance