Royal Enfield Super Meteor 650: रॉयल इन्फिल्डच्या बाईक्स देशात प्रचंड लोकप्रिय आहेत. वजनदार आणि शक्तीशाली बाईक्स अशी त्यांची ओळख आहे. खडतर रस्त्यांवरून ही बाईक सहज पुढे जाते, तसेच उंच ठिकाणी देखील या बाईक तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. देश भ्रमंती करणारे बाईक रायडर्स रॉयल इन्फिल्डच्या बाईक्सना प्रचंड पसंती देतात. दुचाकीच्या जगतात रॉयल इनफिल्डला एक वेगळाच दर्जा आहे. दिग्गज वाहन निर्माती कंपनी रॉयल एनफील्डने अलिकडच्या काळात अनेक टू-व्हीलर मॉडेल्स सादर केले आहेत. यामध्ये Royal Enfield Super Meteor 650 सारख्या बाईक्सचाही समावेश आहे.

रॉयल एनफिल्डने 2022 EICMA मध्ये आपली Super Meteor 650 बाईक प्रदर्शित केली होती. यानंतर गोव्यात झालेल्या रायडर मॅनियामध्ये ही बाईक भारतात लॉन्च करण्यात आली. आता ती लवकरच बाजारात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. सर्व-नवीन Royal Enfield Super Meteor 650 च्या किमती १६ जानेवारी २०२३ रोजी अधिकृतपणे जाहीर केल्या जातील. ही कंपनीची भारतातील सर्वात महागडी बाईक असेल, असेल सांगितले जात आहे.

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच

(हे ही वाचा : Auto Expo 2023: जबरदस्त पॉवर रेंजसह Ultraviolette ची बाईक घालणार देशात धुमाकूळ; जबरदस्त फीचर्स पाहून व्हाल थक्क )

Royal Enfield Super Meteor 650 चे ‘असे’ आहे डिझाईन

रॉयल इन्फिल्ड सुपर मेटिओर ६५० मध्ये टिअरड्रॉप आकाराचे फ्युअल टँक, गोलाकार एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प, रुंद हँडलबार, स्प्लिट टाइप सीट, ड्युअल एक्झॉस्टसह पुढच्या दिशेने पाय राहातील अशी बसण्याची व्यवस्था असेल. बाईकमध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि मल्टी स्पोक अलॉय व्हिल्स असतील.

(Photo-financialexpress)

Royal Enfield Super Meteor 650 चे इंजिन

बाईकमध्ये ६४८ सीसी पॅरेलल ट्विन इंजिन असेल. हे इंजिन ४७.५ बीएचपीची शक्ती आणि ५२ एनएमचा टॉर्क निर्माण करण्याची शक्यता आहे. बाईकला स्लिपर क्लचसह सिक्स स्पिड गेअरबॉक्स मिळेल.

Royal Enfield Super Meteor 650 किंमत

सुरक्षेसाठी बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएससह मागे आणि पुढे डिस्क ब्रेक असेल. मागे ट्विन शॉक अब्झॉर्बर आणि पुढे फ्रंट इनव्हर्टेड फोर्क असतील. या बाईकची किंमत ३.५ लाखांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या टूरर व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत ४ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Story img Loader