भोजपुरी अभिनेता मनोज पांडेला अटक केल्याच्या दोन दिवसांनंतर त्याच्या पत्नीला मनोजची मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पांडेवर लग्नाचे आमिष दाखवून २७ वर्षीय गायिकेचा बलात्कार केल्याचा आरोप आहे.
या भारतीय अभिनेत्यावर परवेझ मुशर्रफांनी घातली होती बंदी
मुंबईतील चारकोप पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनेत्याच्या पत्नीला कांदिवलीच्या त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. मनोज आणि त्याच्या पत्नीने पीडितेचे सुमारे १० लाख ८० हजार रुपयेही लुबाडले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पीडितेने १५ सप्टेंबरला मनोज विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली, त्यानंतर मनोजच्या पत्नीने पीडितेला मनोजपासून लांब राहण्यास सांगत धमकावले होते. मनोजला गुरुवारी कल्याणमधून अटक करण्यात आले.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, मनोज आणि तिची ओळख २०१२ मध्ये एका सिनेमाच्या सेटवर झाली. यावेळी मनोजने तिच्यासोबत प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार पांडेचा भाऊ सांगून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी मुंबईत कांदिवलमध्ये भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. या घराचे भाडेही पीडिताच भरत होती.
‘यूनीब्रोमुळे’ या व्यक्तीही झाल्या प्रसिद्ध
गर्भपात करण्यास सांगितले
पीडितेला जबरदस्ती गर्भपात करण्यास सांगितल्याचा आरोपही मनोजवर करण्यात आला आहे. २०१५ मध्ये पीडिता ३ महिन्यांची गरोदर असताना मनोजने तिला गर्भपात करण्यास सांगितले होते. मनोज अनेक मुलींना फसवायचा. त्याच्याकडे एकाचवेळी अनेक सीम कार्ड आणि मोबाइल नंबर असायचे. याप्रकरणाआधीही एका पीडितेने मनोज पांडेविरोधात वर्सोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.