इस्लाम धर्मातील तलाक देण्याच्या पद्धतीस विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करणाऱ्या शायराबानोने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहे. पतीने आपल्याला सहावेळा बळजबरीने गर्भपात करायला लावल्याचे तिने म्हटले आहे. गर्भपातामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम झाला आणि त्यामुळेच आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचे तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
शहाबानो ते शायराबानो
पतीकडून आपल्याला बळजबरीने काही गोळ्या देण्यात येत होत्या. त्यामुळे माझ्या शरीरावर त्याचा परिणाम झाला, असे शायराबानो हिने म्हटले आहे. शायराबानो हिला एक मुलगा आणि एक मुलगी असून सध्या ते दोघेही तिच्या पतीकडेच वास्तव्यास आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये तिचे पती रिझवान अहमद यांनी तिला तलाक दिला होता. त्यानंतर तिने इस्लाम धर्मातील तलाक पद्धतीला विरोध करीत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या तलाक पद्धतीची वैधता तपासण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे आणि केंद्र सरकारचे मतही मागविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I was forced to undergo abortion 6 times says shayara bano