कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या निशाणा बनवून केलेल्या ट्विटसाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतविरोधात कर्नाटक पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका न्यायालयानं कंगनाविरोधात FIR दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी पोलिसांनी केली आहे.
कृषी विषयक विधेयकांवरून काही शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला ट्विटच्या माध्यमातून कंगनाने आपला विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर वकील रमेश नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यालायात कंगना विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावरणी दरम्यान न्यायालयानं क्याथासंगरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांना कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.
प्रधानमंत्री जी कोई सो रहा हो उसे जगाया जा सकता है, जिसे ग़लतफ़हमी हो उसे समझाया जा सकता है मगर जो सोने की ऐक्टिंग करे, नासमझने की ऐक्टिंग करे उसे आपके समझाने से क्या फ़र्क़ पड़ेगा? ये वही आतंकी हैं CAA से एक भी इंसान की सिटिज़ेन्शिप नहीं गयी मगर इन्होंने ख़ून की नदियाँ बहा दी. https://t.co/ni4G6pMmc3
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 20, 2020
काय म्हणाली होती कंगना?
“कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, ज्याला गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं सोंग करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत. त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहे CAA मुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले. अशा शब्दांमध्ये ट्विट करत कंगना रणौतने या विधेयकांचा विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला होता.