नोकरदारांना निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये म्हणून सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे ‘भविष्य निर्वाह निधी योजना’ (EPF). या योजनेअंतर्गत पगारातून ठराविक रक्कम दर महिन्याला कापली जाते. ही रक्कम म्हणजे एकप्रकारची गुंतवणूकच असते, ज्याचा फायदा नोकरदारांना निवृत्तीनंतर होतो. पण, अचानक आपल्याला पैशांची चणचण भासायला लागते. त्यावेळी अखेरचा मार्ग म्हणजे पीएफमधील जमा रक्कम.
आणखी वाचा : या सोप्या पद्धतीनं तपासा PF बॅलन्स
घरातील मोठे कार्य, मुलांच्या लग्न-शिक्षणासाठी पैसा हवा तर पगारदारांसाठी त्यांच्या भविष्यनिर्वाह निधी खात्यातील रक्कम मोठा आधार असतो. पीएफमधील रक्कम काढायची असल्यास सरकारनं काही नियमांत बदल केले आहेत. पीएफमधील रक्कम काढायची असल्यास तुम्हाला ऑनलाइन क्लेम करावा लागेल. त्यासाठी योग्य ते कारण असायला हवं. जाणून घेऊयात पीएफमधील रक्कम कधी काढता येऊ शकते….
आणखी वाचा : २५ हजारांच्या बेसिक पगारातही होऊ शकता कोट्यधीश, जाणून घ्या कसं
– वयाची ५८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पीएफमधील सर्व रक्कम काढू शकतो.
– लग्नकार्यासाठी तुम्ही पीएफ खात्यामधून पैसे काढू शकता. मुलं, भाऊ, बहीण यांच्या लग्नासाठी पीफची रक्कम काढायची असेल तर 50 टक्के रक्कम काढू शकता. रक्कम काढण्यासाठी सात वर्ष नोकरी करणे अनिवार्य आहे.
– पत्नी किंवा मुलांच्या उच्चशिक्षणासाठीही पीफमधील ५० टक्के रक्कम काढू शकता.
– घर किंवा जमिनीची खरेदी करायची असेल आणि नोकरीची पाच वर्षं पूर्ण झाली असतील तर पीएफ खात्यातून रक्कम काढू शकता.
आणखी वाचा : घरबसल्या काढा PF मधील रक्कम, तीन दिवसांत जमा होईल खात्यावर
– गृहकर्ज फेडण्यासाठीही पीएफमधील ९० टक्के रक्कम काढता येते. तीन वर्षांपर्यंत नोकरी पूर्ण झाल्यानंतर रक्कम काढता येते.
– घराच्या सुशोभिकरणांसाठीही पीएफमधील जमा रक्कम काढू शकता. घर कर्मचारी किंवा त्याच्या पत्नीच्या नावे असायला हवं. तसेच पाच वर्ष नोकरीची पुर्ण केलेली असावीत.
आणखी वाचा : PF च्या नियमांत होणार मोठा बदल, यांना होईल फायदा
– तुमच्यावर किंवा पत्नी, मुलं आणि आईबाबांच्या उपचारांसाठीही पीएपमधून पैसे काढू शकता. यासाठी आवश्यक ती कागदपत्रं सादर करावी लागतील.
– दोन महिन्यापेक्षा जास्त काळ नोकरीविना असलेल्या कर्मचाऱ्यांना पीएफमधील सर्व रक्कम काढता येते.