नोकरी करणाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडेंट फंडची (PF) रक्कम महत्वाची असते. कारण, ही रक्कम अनेक गरजा पुर्ण करते. जर पीएफमधील जमा रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल. तुम्हाला तुमच्या एम्प्लॉअर (Employer) सोबत बोलून सॅलरी स्ट्रक्चरमध्ये थोडा बदल करायला सांगावं लागेल. तुम्हाला एम्प्लॉअरला तुमच्या पीएफ कंट्रीब्यूशन (PF Conntribution)ची रक्कम वाढवायला सांगावी लागेल. पीएफ कंट्रीब्यूशन वाढवल्यामुळे तुमची इन हँड सॅलरी कमी येईल. पण, तुमचा पीएफ फंड दुप्पट होऊ शकतो. त्यासोबतच तुमची चांगली बचत तर होईलच शिवाय टॅक्समध्ये फायदा होईल.
आणखी वाचा : या सोप्या पद्धतीनं तपासा PF बॅलन्स
नोकरी करणाऱ्यांची पीएफमधील जमा रक्कम दोन खात्यामध्ये जाते. त्यामधील पहिला प्रोव्हिडेंट फंड (EPF) आणि दुसरा पेन्शन फंड (EPS) कर्मचाऱ्याच्या बेसीक पगारातील १२ टक्के रक्मम प्रोव्हिडेंट फंडात (EPF) जमा होते. त्याशिवाय कंपनीकडून जमा होणाऱ्या रक्कमेतील ३.६७ टक्के प्रोव्हिडेंट फंडात (EPF) आणि ८.३३ टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन फंडात (EPS) जमा होते.
ईपीएफमधील पैसे कसे वाढवाल?
– जर एखादा कर्मचारी मासिक पीएफ कंट्रीब्यूशन दुप्पट करत असेल तर पीएफ फंडाची रक्कमही दुप्पट होते. म्हणजेच सध्याच्या बेसीक पगारातील १२ टक्के रक्कम पीएफमध्ये जमा होत असेल तर ती २४ टक्के करावी.
– पीएफ फंड दुप्पट होण्याबरबोरच तुम्हाला दुप्पट व्याजचा फायदाही मिळेल. पीएफवरील व्याज चक्रवाढ व्याजानुसार वाढते. त्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणतात. तुमचा पीएफ फंड दुप्पटही होईल शिवाय प्रत्येक वर्षी तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्याजावर व्याजही मिळेल. तुम्ही निवृत्त होईपर्यंत तुमच्या खात्यात मोठी राशी जमा झालेली असेल.
आणखी वाचा : २५ हजारांच्या बेसिक पगारातही होऊ शकता कोट्यधीश, जाणून घ्या कसं
– जर एम्प्लॉअर तुमचं पीएफ कंट्रीब्यूशन वाढवले तर तुमच्या पीएफ खात्यावर जास्त रक्कम जमा होईल.
– जर योग्य वेळी पीएफ कंट्रीब्यूशन वाढवल्यास निवृत्तीपर्यंत तुमचा फंड दुप्पट झालेला असेल. सध्या एम्प्लॉइज प्रोविडेंट फंड म्हणजेच EPF वर ८.६५ टक्के व्याज मिळत आहे. पीएफ कंट्रीब्यूशन वाढल्यानंतर पीएफ राशीवर मिळाणारे व्याजही वाढेल.
– EPFO च्या नियमांनुसार प्रत्येक क्रमचारी पीएफ कंट्रीब्यूशन वाढवू शकतो. एम्पॉलाई प्रॉव्हिडेंट फंड एक्टनुसार ही सूट देण्यात आली आहे.
– नियामांनुसार, प्रोव्हिडेंट फंडात बेसीक पगार आणि डीएच्या १२ टक्के रक्कम जमा होते. तसेच इतकीच रक्कम कंपनीकडूनही कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यावर जमा होते.
– एम्पॉलाई प्रॉव्हिडेंट फंडच्या नियमांनुसार कोणताही कर्मचारी आपलं मासिक कंट्रीब्यूशनला बेसीक पगाराइतकं वाढवू शकतो.
आणखी वाचा :
घरबसल्या काढा PF मधील रक्कम, तीन दिवसांत जमा होईल खात्यावर