सध्या करोनामुळे क्रीडा क्षेत्राला वाईट दिवस आले आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी IPL स्पर्धा करोनाच्या भीतीने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तशातच भारतासाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या मुष्टियुद्ध विश्वविजेतेपद स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क गमावण्याची नामुष्की भारतावर ओढवली आहे. भारत या स्पर्धेचे यजमानपद भुषवण्यासाठी उत्सुक होता. त्यानुसार सर्व गोष्टी करणं भारताला क्रमप्राप्त होतं, पण यजमानपदाची बोली लावताना भारताने सांगितलेली एक रक्कम जमा करावी लागते. ती यजमानपदाची रक्‍कम (Host Fee) दिलेल्या वेळेत भरण्यास भारत असमर्थ ठरल्याने भारताचे यजमान पदाचे हक्क काढून घेऊन ते आता सर्बियाला देण्यात आले आहेत.

अल्लू अर्जुनच्या गाण्यावर वॉर्नर दांपत्याचा डान्स सुरु असतानाच लेक मध्ये आली अन्…

पीटीआयच्या वृत्तानुसार, २०१७ साली भारताने या स्पर्धेच्या यजमानपदासाठी बोली लावली होती. त्यानंतर अर्जदेखील दाखल केला होता. होस्ट सिटी कराराच्या अटींनुसार नवी दिल्लीने होस्ट फी भरण्याचे बंधन पूर्ण न केल्यामुळे AIBA ने तो करार संपुष्टात आणला आहे. त्यामुळे आता भारताला ५०० अमेरिकन डॉलर्सचा दंड (cancellation fee) भरावा लागेल, असे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना (AIBA) एका निवेदनात म्हटले आहे.

“तुमचे सिनेमे पाहूनच आम्ही लहानाचे मोठे झालो” वाचा सचिनची भावनिक पोस्ट

भारताने तीन वर्षांपूर्वी या यजमानपदासाठी प्रयत्न सुरू केले होते. जागतिक बॉक्सिंग संघटनेने भारताचा अर्ज स्वीकारला होता. मात्र, त्यानंतर जमा करावी लागणारी रक्कम भारताकडून भरण्यात आली नाही. त्यामुळे भारतीय मुष्टियुद्ध संघटनेने सुरू केलेली तयारीही वाया जाणार आहे. दरम्यान, हे यजमानपद आता सर्बियाकडे आहे. “सर्बियाकडे मुष्टियोद्धा, त्यांचे प्रशिक्षक, अधिकारी आणि बॉक्सिंग चाहत्यांसाठी एक उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्याचे सामर्थ्य आहे,” असे AIBA चे अंतरिम अध्यक्ष मोहम्मद मौस्ताहसने यांनी यजमानपद बहाल करताना सांगितले.

Story img Loader