कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून मात केली. धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी मैदानावर जमली होती. परंतू आश्विनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेत असताना रोहित आणि सूर्यकुमारमध्ये गोंधळ झाला आणि यात फॉर्मात असलेल्या रोहितची विकेट वाचवण्यासाठी सूर्यकुमारला आपल्या विकेटवर पाणी सोडावं लागलं.

काय घडलं त्यावेळी मैदानावर वाचा सविस्तर Video : रोहितसाठी सूर्यकुमारने स्वत:च्या विकेटवर सोडलं पाणी, नेटकरीही झाले फिदा

सामना संपल्यानंतर रोहितला मैदानावर घडलेल्या त्या दुर्दैवी प्रसंगाबद्दल विचारण्यात आलं. यावेळी बोलत असताना रोहितनेही सूर्यकुमारच्या विकेटवर खंत व्यक्त केली. “सूर्यकुमार सध्या ज्या फॉर्मात आहे ते पाहता मला त्याच्यासाठी आपली विकेट सोडायला हवी होती. पण संपूर्ण स्पर्धेत सूर्यकुमारने संघासाठी चांगली फटकेबाजी केली आहे.”

कर्णधार म्हणून रोहित शर्माचं हे पाचवं विजेतेपद ठरलं तर खेळाडू म्हणून सहावं. चेन्नई सुपरकिंग्जनंतर सलग दोनवेळा विजेतेपद राखणारा मुंबई इंडियन्स दुसरा संघ ठरला आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : संघासाठी बलिदान द्यावं लागलं तरी हरकत नाही – सूर्यकुमार यादव

Story img Loader