आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ आता युएईत दाखल झाले आहेत. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीआयने यंदा स्पर्धेचं आयोजन युएईत केलं आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने खेळाडू व इतर सदस्यांसाठी Bio Security Bubble तयार केलं आहे. चेन्नई संघातील दोन खेळाडूंना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. बीसीसीआयने सर्व संघांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी Bluetooth Device दिलेलं आहे. परंतू मुंबई इंडियन्सने यापुढे जात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणखी एक पाऊल पुढे टाकत Smart Ring नावाचं एक उपकरण आपल्या संघातील खेळाडूंना दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in