रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याला १० मी. एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाने अवघ्या ०.५ गुणांच्या फरकाने हुलकावणी दिली. पात्रता फेरीत ७ वे स्थान प्राप्त करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविलेल्या अभिनवने पदकासाठीच्या लढतीत चांगली कामगिरी केली. मात्र, अखेरच्या क्षणी अभिनवला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

अंतिम फेरी सुरू झाल्यानंतर गुणांची कमाई करत अभिनवने सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली होती. त्यानंतर तिसऱया स्थानासाठी अभिनव आणि युक्रेनच्या कुलीश याच्याशी गुणांची बरोबरी झाली. मग दोघांमध्ये तिसऱया स्थानासाठी शूटऑफ घेण्यात आला. यात कुलीशने १०.५ गुण कमावले, तर अभिनवला १० गुण मिळवता आले. अवघ्या ०.५ गुणांनी अभिनवचे कांस्य पदक हुकले.

ICC Annual Team Rankings Announced
वनडे आणि ट्वेन्टी२० प्रकारात टीम इंडिया अव्वल; आयसीसीची वार्षिक क्रमवारी जाहीर
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL2024 : कोलकातासाठी २४.७५ कोटींचा गोलंदाज पडला महागात, फक्त पॉवरप्लेमध्ये दिल्या आहेत तब्बल ‘इतक्या’ धावा
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण

भारताला अद्याप रिओ ऑलिम्पिकमध्ये एकही पदक जिंकता आलेले नाही. अभिनव बिंद्राच्या अंतिम फेरीतील समावेशावरून भारताकडे पदक कमाविण्याच्या संधी होती. त्यामुळे संपूर्ण भारतीयांचे लक्ष अभिनवच्या कामगिरीकडे होते. पण, नेमबाजीत देखील भारताच्या पदरी निराशाच पडली. पात्रता फेरीत अभिनवने एकूण ६२५.७ गुणांची कमाई केली होती. गगन नारंगने मात्र यंदा निराशा केली. गगन नारंगला प्राथमिक फेरीतूनच स्पर्धेच्या बाहेर पडावे लागले होते.

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्णपदकाची कमाई केली होती, तर गगन नारंगने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव आणि गगनच्या पहिल्या फेरीला सुरूवात झाली तेव्हा गगन नारंग याच्याकडे गुणतालिकेत बिंद्रापेक्षा चांगली आघाडी होती. गगनने पहिल्या दोन सेट्समध्ये दमदार कामगिरी केली. मात्र, ही आघाडी त्याला पुढील सर्व सेट्समध्ये राखता आली नाही. दुसऱया बाजूने अभिनव बिंद्राने उत्तरोत्तर चांगले गुण कमावत अखेरीस क्रमवारीत ७ वे स्थान गाठले, तर गगन नारंग पहिल्या २० खेळाडूंच्या यादीबाहेर फेकला गेला.

UPDATES:

# अभिनवचा ‘नेम चुकला’, अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर मानावे लागले समाधान. ऑलिम्पिक पदक अवघ्या काही गुणांनी हुकले.

# अभिनवचे पुनरागमन, १०.२ गुणांसह पुन्हा चौथ्या स्थानावर झेप. स्पर्धेतून बाद होण्याची टांगती तलवार टळली.

# सहाव्या शॉटनंतर अभिनवची पुन्हा ७ व्या स्थानी घसरण.

# अभिनवची चांगली सुरूवात, क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप

# १० मी. एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीला सुरूवात, अभिनव ब्रिंद्राच्या कामगिरीकडे साऱयांचे लक्ष.

# पहिले आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात, अंतिम गुणतालिकेनुसार अभिनवला मिळाले ७ वे स्थान. त्यामुळे अभिनव देखील अंतिम फेरीत खेळणार.

# अखेरच्या शॉटमध्ये अभिनवने कमावले १०५ गुण कमावले. अभिनवचे एकूण गुण ६२५.७ गुण.

VIDEO: अभिनव बिंद्रा भारतीय पथकाचे संचलन करतो तेव्हा..

# अभिनव बिंद्राचे पुनरागमन, सर्व सेट्सच्या अखेरीस अभिनवला मिळाले ७ वे स्थान. अंतिम फेरीसाठी अभिनव पात्र, तर गगन नारंगला पात्रता फेरीतूनच बाहेर.

# पाचव्या सेटमध्ये अभिनवने कमावले फक्त १०२.१ गुण. अभिनवची १२ व्या स्थानी घसरण, तर गगन नारंग २९ व्या स्थानी

# अरेरे…गगन पाठोपाठ आता अभिनवकडूनही पाचव्या सेटमध्ये खराब कामगिरी.

# चांगली सुरूवात करूनही गगन नारंगकडून उत्तरार्धात निराशाजनक कामगिरी, नारंग पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीच्याही बाहेर.

# चौथ्या सेटमध्ये बिंद्रा पाचव्या स्थानावर, कमावले १०३.८ गुण.

# तिसऱया सेटमध्ये बिंद्राने घेतली आघाडी, कमावले १०५.९ गुण, क्रमवारीत दुसऱया स्थानावर झेप. दरम्यान, गगन नारंगच्या क्रमवारीत घसरण.

# बिंद्राने गगनला टाकले मागे, चांगल्या सुरूवात मिळूनही गगनकडून तिसऱया सेटमध्ये निराशाजनक कामगिरी.

# दुसऱया सेटमध्ये गगनची चांगली कामगिरी, मिळवले १०४.४ गुण. अभिनव बिंद्रा ११ व्या स्थानी