– डॉ. शारदा महांडुळे

पावटा ही वनस्पती शेंगवेल या प्रकारात मोडते. पावटय़ाच्या हिरव्यागार शेंगा भाजीसाठी उपयोगात आणल्या जातात. मराठीत पावटा, संस्कृतमध्ये निष्षाव, इंग्रजीमध्ये हायशिन्थबेन, तर शास्त्रीय भाषेत लाबलाब परपुरिअस या नावाने ओळखली जात असून तो पॅपिलिओनसी या कुळातील आहे. पावटा या वनस्पतीच्या वेलीची फुले जांभळी किंवा पांढऱ्या रंगाची असतात. त्याची पाने ही लांब दांडय़ाची असतात. पावटय़ाच्या देठ हा लांब मऊ असतो. पावटा वेलाची लागवड भाजी उत्पादनासाठी संपूर्ण भारतात केली जाते. शेतामध्ये, घराजवळ तसेच घराजवळील परसबागेमध्ये याचे उत्पादन घेतले जाते. खाण्यासाठी भाजी म्हणून पावटय़ाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
onion prices Nashik, falling onion prices,
उपाय न योजल्यास कांदा अधिक घसरण्याची भीती, लासलगाव समितीचे केंद्रीय अर्थमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना साकडे

औषधी गुणधर्म

आयुर्वेदानुसार पावटा हा दीपक, पाचक, बलकर, वेदनाशामक, स्तंभक व ज्वरघ्न आहे. आधुनिक शास्त्रानुसार पावटय़ामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, आर्द्रता, तंतुमय पिष्टमय पदार्थ ब व क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामध्ये असणाऱ्या या औषधी गुणधर्मामुळेच त्याचा वापर विविध आजारांवर केला जातो.

नक्की वाचा >> खोकला, अन्नपचन, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अन् बरचं काही…; जाणून घ्या कोथिंबीरीचे १२ फायदे

उपयोग

१)
जर आम्लपित्ताचा त्रास होऊन पोटामध्ये जळजळ व वेदना जाणवत असतील तर त्या थांबविण्यासाठी पावटय़ाच्या शेंगाचा काढा करून पिण्यास द्यावा.

२)
काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी अति प्रमाणात रक्तस्राव होतो व त्या रक्तस्रावामुळे पोटात वेदनाही होतात. अशा वेळी पावटा गुणकारी ठरतो.

३)
जर तापाचा वेग जास्त प्रमाणात वाढला असेल तर शरीराचा ताप कमी करण्यासाठी पावटय़ाचा रस पिण्यास द्यावा.

४)
भूक कमी लागणे, अपचन, आम्लपित्त या विकारांवर पावटा गुणकारी ठरतो. पावटा खाल्ल्याने शरीरातील आमाशयाला (जठराला) बल मिळते व त्यातून वरील आजार कमी होतात.

५)
शरीरावर बऱ्याच दिवसांची जुनी जखम झालेली असेल तर ती जखम भरून येण्यासाठी व तेथील वेदना कमी करण्यासाठी पावटय़ाच्या शेंगाची भाजी करून नियमित खावी व पावटय़ाचा कल्क जखमेवर लावावा.

६)
कान ठणकत असेल तर अशा वेळी पावटय़ाचा गाळलेला रस कानात २ थेंब टाकावा. यामुळे ठणका लगेचच कमी होतो.

७)
अंगावरून पांढरे पाणी जात असेल (श्वेतस्राव) तर पावटय़ाचा काढा करून अर्धा कप दोन वेळा घ्यावा.

८)
ओटीपोट व कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी पावटय़ाची भाजी नियमितपणे आहारात खावी.

९)
आयुर्वेदामध्ये पावटे व वाल या दोन्ही भाजीच्या शेंगांना निष्पाव हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. या वनस्पतींची बरेचसे गुणधर्म सारखे आहेत.

नक्की वाचा >> सकाळी चहाऐवजी एक ग्लास हळदीचं पाणी प्यायल्यास होणारे पाच फायदे वाचून थक्क व्हाल

१०)
पावटय़ाचा रस अर्धा कप सकाळी व संध्याकाळी पिण्यास दिल्याने त्याच्या स्तंभक व वेदनाशामक गुणांमुळे मासिक रक्तस्राव कमी होऊन पोटातील वेदना थांबतात.

सावधानता

पावटा या वनस्पतीचा औषधी म्हणून सर्व अंगाचा उपयोग केला जातो. फक्त मुळाचा उपयोग केला जात नाही. कारण मूळ हे काही प्रमाणात विषारी असते. त्याचा वापर केल्यास शरीराला ते बाधू शकते.

 

Story img Loader