भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ (Provident Fund)मध्ये नोकरदाराच्या पगारामधील मोठा वाटा असतो. इन हँड सॅलरी म्हणजे हातात येणारा पगारराची रक्कम जास्तीत जास्त मिळावी म्हणून काहीजण पीएफ कमी करण्याचा विचार करतात. EPFOने यावरच उपाय शोधण्यासाठी पावले उचलली आहे. त्यामुळे लवकरच पीएफच्या नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा : २५ हजारांच्या बेसिक पगारातही होऊ शकता कोट्यधीश, जाणून घ्या कसं
पीएफच्या नव्या नियमांनुसार अनेकजण पीएफमधील कॉन्ट्रिब्युशन कमी करू शकतील. पण, मर्यादीत लोकांनाच पीएफमधील कॉन्ट्रिब्युशन कमी करता येणार आहे. आधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पीएफमधील योगदान कमी करण्याचा नियम सगळ्यांसाठी लागू करण्यात आलेला नाही. काही श्रेणींमधील लोकांनाच फक्त याची परवानगी देण्यात येईल. निकषांच्या आधारावर या श्रेणी ठरवण्यात येतील. यामध्ये महिला कर्मचारी आणि दिव्यांगाचा समावेश होऊ शकतो. मनुष्यबळ विकास मंत्रालय अखेरचा निर्णय घेईल.
आणखी वाचा : या सोप्या पद्धतीनं तपासा PF बॅलन्स
महिला कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी त्याचबरोबर २५ ते ३५ वर्ष वयोगटातील कर्मचाऱ्यांना पीएफमधील योगदान दोन ते तीन टक्क्यांनी कमी करण्याची परवानगी मिळू शकते. निवृत्तीवेळी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा हवी असते. त्याचवेळी तरुण कर्मचाऱ्यांना लग्न, घर खरेदी आणि करिअरच्या सुरुवातीच्या वर्षांत काही गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त पैशांची आवश्यकता असते. हे सगळं लक्षात घेऊनच हा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे एका आधिकऱ्यानं सांगितलं.
आणखी वाचा : घरबसल्या काढा PF मधील रक्कम, तीन दिवसांत जमा होईल खात्यावर