चित्रकथी
..तुपे सर चित्रकार म्हणून तर दिग्गज किंवा मोठे होतेच, पण त्याहीपेक्षा ते माणूस म्हणून अधिक श्रेष्ठ होते. त्यांच्या माणूसपणाच्या गोष्टी सांगणारे चित्रकारच नव्हे तर रसिक आणि सामान्यजन केवळ राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही सहज भेटतील. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर व्यक्त झालेली हळहळ राज्याबाहेरही असेलच. एरवी एखादी व्यक्ती निवर्तली की, ‘मोठी पोकळी निर्माण झाली’ किंवा मग लोकप्रिय व्यक्तिमत्त्व
आधी केले, मग सांगितले हा खाक्या तुपे सरांनी नेहमीच पाळला. त्यामुळेच ते इतर चित्रकारांना जे सांगायचे ते त्यांनी आधी स्वत: केलेले किंवा अमलात आणलेले असायचे. ते नेमाने सराव म्हणून रेखाटने करायचे. सोबत असलेल्या त्यांच्या शबनममध्ये नेहमीच एक रेखाटनांची वही असायची. सरांनी खिशात हात घालून एखादा चिटोरा किंवा काही काढायचा प्रयत्न केला की, त्या चिटोऱ्यावरही तुम्हाला हमखास सरांनी केलेले रेखाटनच सापडावे. हाती लागेल त्या गोष्टीचा वापर ते रेखाटनासाठी करायचे. खरेतर हल्लीच्या आर्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी हे उदाहरण खूप महत्त्वाचे आहे. कारण वर्गात एखादी गोष्ट करायला सांगितली
चित्र रेखाटने, त्यांचा सराव याबाबत ते नेहमीच एक किस्सा सांगायचे. एकदा प्रसिद्ध चित्रकार आलमेलकर त्यांच्याकडे जेवायला आले होते. जेवायला बसणार, तोच आलमेलकरांना काही आठवले आणि ते म्हणाले, मी आलोच. त्यानंतर एका कागदावर त्यांनी तीन गोल काढले आणि मग ते जेवायला बसले. त्यावर तुपे सरांनी त्यांना विचारले, हा काय प्रकार आहे? त्यावर ते उत्तरले की, तीन रेखाटने झाल्याशिवाय जेवण नाही हा नेम आहे. आज काहीच केलेले नाही असे होता कामा नये, म्हणून नेम पाळला. काय केले यापेक्षा काही का असेना पण केले आणि नेम पाळला हे महत्त्वाचे आहे. बहुधा हा किस्सा तुपे सरांच्या मनात कायम कोरला गेला असावा. कारण त्यांनीही रेखाटने केलेली नाहीत, असा दिवस गेलेला नाही!
तुपे सर हा स्टुडिओतला नव्हे तर माणसांतला चित्रकार होता. तेच त्यांचे मोठे वैशिष्टय़ होते. समाजात जाऊन, एखाद्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चित्रण करणारे कलावंत कमी झाले आहेत. एकतर तेवढा सराव अलीकडच्या पिढीला नाही आणि त्यासाठी लागणारे धाडसही आता कमी झाले आहे. पूर्वी चित्रकार शेतात बसून, आडवाटेला किंवा अगदी शहरातही रस्त्यावर बसून चित्र रेखाटताना नजरेस पडायचे. मग सामान्य रसिकांच्या कुतूहलपूर्ण नजरा त्या चित्रावरून फिरायच्या आणि समोरचे दृश्य त्या चित्रात किती छान पद्धतीने आले आहे, त्यावर तिथेच चर्चा रंगायची. रसिक हे चित्रकार नसले तरी समोरच्या दृश्यातील सौंदर्यपूर्ण बाबी किती आणि
एखाद्या ठिकाणी त्यांना चित्र काढावेसे वाटले की, ते तिथेच बसायचे आणि मग चित्रण सुरू व्हायचे. एकदा तर ते चित्रणासाठी बसले तेव्हा लक्षात आले की, पॅलेट घरी राहिले आहे. त्याने त्यांना काहीच फरक पडला नाही. त्यांनी थेट बाजूच्या दगडावरच रंग ओतले आणि चित्रण सुरू केले. तो दगड त्यांच्यासाठी पॅलेट झाला. त्या दगडाचेही भाग्य काही औरच असावे त्या दिवशी, तो धन्य झाला!
प्रत्यक्ष स्थळचित्रण हा सरांचा आवडीचा विषय. संपूर्ण आयुष्यात सरांनी ३० हून अधिक प्रदर्शने केली. पण त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष चित्रणांना आणि प्रत्यक्ष चित्रण कार्यशाळांना तर गणतीच नाही, अशी स्थिती आहे. नाशिक कला निकेतनचे प्रसिद्ध चित्रकार वा. गो. कुलकर्णी आणि शिवाजी तुपे यांनीच तर देशातील पहिल्यावहिल्या ‘ऑन द स्पॉट’ चित्र स्पर्धेस तेव्हा सुरुवात केली होती. अशा प्रकारची स्पर्धा नंतर देशभरात कुठे झाल्याचे ऐकिवात नाही. त्यानिमित्ताने नाशिककरांना अनेक प्रसिद्ध चित्रकार थेट नाशकात पाहायला मिळाले.
तुपे सरांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ते कोणत्याही ठिकाणी चित्र काढण्यासाठी बसले की, मग सुरुवातीस ते इतर चित्रकारांप्रमाणे त्या समोरच्या दृश्याकडे पाहत. अनेकांना असे वाटायचे की, ते सौंदर्यस्थळाचा शोध घेत आहेत, पण ते तसे नसायचे, त्या दृश्याशी त्यांचा संवाद नजरेनेच सुरू व्हायचा आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर स्मित लकेर उमटली की समजायचे आता एक हात पेन्सिल किंवा मग ब्रशच्या दिशेने जाणार आणि मग चित्र सुरू.. व्हायचेही तसेच. ते निसर्गाशी संवाद साधणारे असे चित्रकार होते,
खरेतर कला हा सर्व जाणिवांना व्यापून राहिलेला विषय आहे. पण अनेक कलावंतांच्या बाबतीत असे दिसते की, ते फक्त त्यांच्याच कलाप्रकारांत कार्यरत असतात. पण तुपे सरांचे असे नव्हते. ते अगदी सहज नजरेस पडायचे. ते नेहमी म्हणायचे की, चांगला कलावंत व्हायचे तर इतर कलांमधील जाणही असायलाच हवी. ते स्वत: चांगले वाचकही होते.
त्यांची विनोदबुद्धीही नेहमी ताजी टवटवीत असायची. नाशिकचेच प्रसिद्ध चित्रकार अनिल अभंगे यांनी एकदा सरांना त्यांची प्रदर्शनाची चित्रे पाहण्यासाठी बोलावले तेव्हा सर त्यांना गमतीने म्हणाले, ‘मी तर चित्रकलेशीच लग्न केले, त्यामुळे मला चित्रे जमतात, यात विशेष काहीच नाही. पण तुम्ही तर लग्न करून संसार करता तरी चांगली चित्रे कशी काय काढू शकता?’ विनोदबुद्धी शाबूत असणे, प्रसंगी स्वत:वरही विनोद करता येणे हे चांगला माणूस असण्याचेच लक्षण असते.
सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत हेही तुपे सरांच्या आठवणीने भारावून जातात. ते म्हणतात.. संस्कार भारतीच्या चित्र कार्यशाळांच्या निमित्ताने त्यांच्याशी अनेकदा एकत्र येणे झाले. त्यांच्यातील श्रेष्ठ चित्रकारापेक्षा त्यांच्यातील माणूस खूप भावला. ज्या कुणाशी ते संवाद साधायचे त्या व्यक्तीमधले आणि त्यांच्यातले अंतर दुसऱ्या मिनिटाला नाहीसे व्हायचे. विद्यार्थ्यांना सांगतानाही ते आधी त्यांच्या चांगल्या बाबी सांगायचे आणि मग तो दुखावणार नाही अशा पद्धतीने चित्रणातील त्रुटी सांगायचे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून ते अगदी अनेक मोठय़ा संमेलनांपर्यंत सर्वत्र तुपे सर काम करताना दिसायचे. महत्त्वाचे म्हणजे ते आयोजक असायचे. अनेक ठिकाणी आयोजक केवळ कामावर देखरेख करताना दिसतात. पण ते मात्र काम करताना दिसायचे.’
तुपे सरांच्या निधनानंतर चित्रकार अनिल अभंगे यांच्याशी बोलणे झाले, त्या वेळेस कळले की, यंदाच्या दिवाळीमध्ये सावडर्य़ाला जाण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. तिथे जायचे होते, कारण संभाजी महाराजांना जिथे जेरबंद केले त्या कसब्यामध्ये जाऊन त्यांना तेथील गावातील घरांचे चित्रण करायचे होते. गेल्या खेपेस ते तिथे गेले तेव्हा त्यांना लक्षात आले की, शहरीकरणाच्या रेटय़ानंतरही हे गाव अद्याप बरेचसे गावच राहिले आहे. ते रेखाटण्याची, चितारण्याची त्यांची इच्छा होती. आता अभंगे तिथे जाऊन चित्रण करणार असून त्यातून साकारणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन नाशिकमध्ये करणार आहेत, सरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ. खरेतर नाशिकमध्ये एक चांगले कलादालन असावे, अशी सरांची तीव्र इच्छा होती. नाशिकभूषण असलेल्या कुसुमाग्रजांसोबत त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. पण त्यात अनेक अडचणी आल्या. नाशिकची मंडळी कुठेही गेली की, तिथे बोलताना किंवा नाशिकचा उल्लेख करताना दोन अभिमानिबदूंचा उल्लेख करतात, पहिले कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि दुसरे शिवाजी तुपे. नाशिककरांना खरोखरच याचा रास्त अभिमान असेल आणि नाशिक महापालिकेलाही तसेच खरोखर मनातून वाटत असेल तर गोदाकाठी शिवाजी तुपे सरांच्या मनातील ते सुंदर कलादालन उभे राहायला हवे. तीच सरांसाठी खरी श्रद्धांजली असेल!
माणसातला चित्रकार!
<strong><span style="color: #ff0000;">चित्रकथी</span></strong><br />महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध तर काही नवोदित चित्रकार त्या घटनेने पुरते हबकून गेले होते. ते करायला गेले होते एक आणि समोर घटना घडलेली होती भलतीच.. तीही अंगावर शहारा आणणारी आणि आयुष्यात कधीही विसरता न येण्याजोगी.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-08-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human artist