‘परफेक्शन’ हा शब्द जितक्या सहजतेने वापरता जातो तितका तो सोपा नाही. प्रत्येक गोष्टीतील बारकावे टीपत ती गोष्ट इतरांसमोर सादर करण्यासाठी बरेच प्रयत्नही करावे लागतात. संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटासाठी अशीच मेहनत घेतली आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट साकारण्यासाठी त्यांनी बरंच संशोधनही केलं. ऐतिहासिक पात्रांना रुपेरी पडद्यावर उतरवताना त्यांच्या पोशाखापासून ते दागिन्यांच्या विविध प्रकारांवरही भन्साळी यांनी विशेष लक्ष दिलं. हे सर्व मुद्दे ‘पद्मावती’चा ट्रेलर पाहून लक्षात येत.

या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला तेव्हाच अनेकांचे डोळे दिपले होते. ‘माँगटीका’, गळ्यातील हिरेजहीत हार, बाजूबंद अशा विविध दागिन्यांमध्ये सजलेली दीपिका अनेकांचीच मनं जिंकून गेली. तिचं हे रुप साकारण्यासाठी भन्साळींच्या एका टीमने बरीच महनत घेतली. एका रुपवान राणीचे दागिने कसे असावेत यासाठी भारतातील विविध गावांना त्यांनी भेट दिली, त्या भागातील काही विशेष गोष्टी लक्षात घेत ‘पद्मावती’साठी दीपिकाचे दागिने साकारण्यात आले. सौंदर्य आणि राजेशाही थाट याची सांगड घालत बरंच संशोधन केल्यानंतर दागिन्यांवरील नक्षीकाम साकारण्यात आलं.

Mahindra Bolero and Mahindra Bolero Neo
बाकी कंपन्यांना फुटला घाम! महिंद्राच्या ‘या’ स्वस्त ७ अन् ९ सीटर कारला दरमहिन्याला मिळतेय १० हजार बुकींग, किंमत…
Gold Silver Price Today
Gold-Silver Price: चांदीच्या दरात ११ वर्षांत मोठी वाढ तर सोन्याचा भाव तीन आठवड्यांच्या उच्चांकावर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा दर
ban on oleander flowers in temple
‘या’ राज्यातील मंदिराच्या प्रसादात ऑलिंडरच्या फुलांवर बंदी; नेमके कारण काय?
Akshaya Tritiya, gold, price,
अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी, ‘हे’ आहे आजचे दर
thane water crisis marathi news, thane water shortage marathi news
२३ वर्षांच्या पाणी टंचाईच्या संघर्षाला ठाण्यातील गृहसंस्थेने दिली मात, पाण्याच्या साठवणूकीचे केले यशस्वी नियोजन
pregnant woman, water tank,
धक्कादायक ! आठ महिन्यांच्या गर्भवतीला पाण्याच्या टाकीत….
man killed his one-day-old baby due to having doubts on wifes character
पत्नीच्या चारित्र्यावर संशय; वडिलांनीच केली एका दिवसाच्या बाळाची हत्या
supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश

जवळपास २०० पारंगत कारागिरांच्या कलाकुसरीने तब्बल ६०० दिवसांच्या मेहनतीनंतर पद्मावतीचे दागिने साकारण्यात आले. विविध रुपांमध्ये दागिने तयार करण्यासाठी जवळपास ४०० किलो सोन्याचा वापर करण्यात आला होता. याविषयीची अधिक माहिती देणारा एक व्हिडिओ पद्मावती चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ‘तनिष्क’ या ब्रॅण्डअंतर्गत भन्साळींच्या या भव्य प्रोजेक्टसाठी दागिने घडवण्यात आले आहेत.

राजपूत महिलांची जीवनशैली कशी होती याचं उत्तम प्रतिबिंब दाखवून देण्याचं आव्हान या कलात्मक दागिन्यांनी लिलया पेललं असं म्हणायला हरकत नाही. मोर, घोडा, हत्ती, मोती, कुंदन या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असणारे पारंपरिक राजपूत दागिने आणि सोबत ‘तनिष्क’च्या कारागिरांच्या कलात्मकतेची जोड मिळाल्यामुळे या दागिन्यांचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. ट्रेलरमध्येच दीपिकाने विविध प्रकारचे दागिने घातल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा आता चित्रपटातील तिचे लूक्स आणि दागिने पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स