आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस किंवा परिस्थिती कायम एकसारखीच असते असं नाही. आयुष्याचं दुसरं नाव म्हणजे अनिश्चितता. त्यामुळे पुढच्याच क्षणाला नशीबाने आपल्यासाठी कोणती गोष्टी वाढून ठेवली आहे हे सांगणंसुद्धा कठिणच. याच सर्व परिस्थितीचं गांभीर्य काही सेलिब्रिटींना सुद्धा लक्षात घेत, त्यांच्या ‘सेकंड इंनिंग’ची आखणी केली आहे. प्रत्येक कलाकाराला चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन यांच्याइतकं यश मिळेलच असं नाही. त्यामुळे चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीचा एकंदर आढावा घेत काही अभिनेते आणि अभिनेत्रींनी ‘प्लॅन बी’ तयारच ठेवले आहेत. इंडस्ट्रीत येणारा प्रत्येक कलाकार फक्त आणि फक्त अभिनयातच सक्रिय असतो असा जर तुमचा समज असेल तर तसं नाही. कारण, बरेच सेलिब्रिटी अभिनयाव्यतिरिक्त इतरही काही व्यवसायांमध्ये सक्रिय आहेत. चला तर मग पाहूया सेलिब्रिटींचे प्लॅन बी आहेत तरी काय?

माधुरी दीक्षित-
आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी दीक्षित एक चांगली नृत्यांगनाही आहे. नृत्याची हीच आवड तिने व्यवसायातही रुपांतरित केली. ‘धकधक गर्ल’ माधुरी एक ऑनलाइन डान्स अकॅडमी चालवते. या माध्यमातून नृत्याची आवड असणाऱ्यांसाठी ती नृत्य शिकवते.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

सुनील शेट्टी-
सुनील शेट्टी हॉटेल व्यवसायात उतरला आहे. त्याशिवाय त्याची स्वत:ची निर्मितीसंस्था सुद्धा आहे. ‘पॉपकॉर्न एण्टरटेन्मेंट’ नावाच्या या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘खेल’, ‘रक्त’, ‘भागम भाग’ आणि ‘मिशन इस्तानबुल’ या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती.

लारा दत्ता-
अभिनय क्षेत्रात सध्या लारा दत्ता सक्रिय नसली तरीही ती दुसऱ्याच एका कलात्मक क्षेत्रात सक्रिय आहे. ‘छाबरा ५५५’ या क्लोथिंग ब्रॅण्डच्या साथीने लाराने तिचं साड्यांचं कलेक्शन लाँच केलं आहे. त्याशिवाय तिची स्वत:ची निर्मितीसंस्थाही आहे.

अर्जुन रामपाल-
अर्जुन रामपाल जितका चांगला अभिनेता आहे तितकाच चांगला व्यवसायिकही आहे. अर्जुनची ‘चेसिंग गणेशा’ नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्याशिवाय दिल्लीत त्याचा ‘लॅप- लाऊंज बार अॅण्ड रेस्तरॉ’सुद्धा आहे.

मलायका अरोरा-
‘फिटनेस फ्रिक’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा फॅशन वेबसाइट चालवते. सुझान खान, बिपाशा बासू यांच्या साथीने मलायका ‘द लेबल लाइफ’ नावाची वेबसाइट चालवते.

अजय देवगण-
चित्रपटातील स्टंटसाठी ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगण, गुजरातमधील चारंका सौरउर्जा प्रकल्पातही भागधारक आहे. या प्रकल्पात त्याने बरीच गुंतवणूक केल्याचंही सांगितले जाते. याशिवाय त्याची ‘देवगण एण्टरटेन्मेंट सॉफ्टवेअर लिमिटेड’ नावाची निर्मितीसंस्थाही आहे. या निर्मितीसंस्थेअंतर्गत ‘राजू चाचा’, ‘यू, मी और हम’ आणि ‘ऑल द बेस्ट’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

ट्विंकल खन्ना-
बऱ्याच वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकल्यानंतर अभिनेत्री ट्विंकल खन्नाने लेखन क्षेत्राकडे मोर्चा वळवला. सध्या ती एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये स्तंभलेखनही करते. याशिवाय ती निर्मिती क्षेत्रातही सक्रिय झाली असून, इंटेरियर डिझायनिंगमध्येही तिने स्वत:चा ठसा उमटवला आहे.

अक्षय कुमार-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार येत्या काही वर्षांमध्येही सुपरहिट ठरणार यात शंका नाही. पण, तरीही खिलाडी कुमारने त्याचा ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. ऑनलाइन शॉपिंग चॅनलमध्ये खिलाडी कुमारने गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय ‘हरी ओम एण्टरटेन्मेंट’ हा त्याची निर्मिती संस्थासुद्धा आहे.

मिथून चक्रवर्ती-
अभिनय क्षेत्रातील इनिंग झाल्यानंतर अभिनेता मिथून चक्रवर्ती रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. याशिवाय ‘पापराझी प्रॉडक्शन’ नावाची त्यांची निर्मितीसंस्थासुद्धा आहे.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

(वरील माहिती काही वेबसाइट्सवरील उपलब्ध वृत्तातून घेण्यात आली असून, लोकसत्ता ऑनलाइनने याबाबतची खातरजमा केलेली नाही.)