छोट्या पडद्यावरील अभिनेता अभिनव शुक्ला ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वापासून चांगलाच चर्चेत आला आहे. या शोनंतर आता अभिनव ‘खतरों के खिलाडी’ या स्टंट शोमध्ये दिसून येतोय. याशोमध्ये अभिनव स्पर्धकांना टक्कर देताना दिसतोय. रविवारी पार पडलेल्या ‘खतरों के खिलाडी’च्या एलिमिनेशन राउंडमधून अभिनवची सुटका झालीय. या खास एपिसोडमध्ये श्वेता तिवारीसोबतच्या एका राऊंडमध्ये अभिनवने एक मोठा खुलासा केला आहे.

या एपिसोडमध्ये अभिनव शुक्लाने त्याच्या एका आजाराबद्दल सांगितलं आहे. या आजारामुळे आपल्याला अंक आणि अक्षर समजणं कठीण जातं असल्याचं तो म्हणाला. या एपिसोडनंतर अभिनव शुक्लाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या या आजाराबद्दल सांगितलं आहे. अभिनवने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये तो म्हणाला, “मी बॉर्डरलाइन डिस्लेक्सिक आहे आणि आता हे सगळ्यांना कळालंचं आहे तर मी याबद्दल मोकळेपणाने बोलणार आहे. यात माझी किंवा कुणाची चूक नाही. मला हे स्विकारण्यास दोन दशकं गेली. आता मला संख्या आणि आकड्यांमुळे लाजणं गरजेचं नाही.” असं तो म्हणालाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinav Shukla (@ashukla09)

हे देखील वाचा: राज कुंद्राच्या अटकेनंतरही शिल्पाची बहीण शमिता शेट्टीची ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये एण्ट्री; म्हणाली…

तर अभिनवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. यात तो म्हणाला, “होय आकडे, अक्षरं आणि शब्दांमध्ये माझा गोंधळ होतो. मला तारीख, नाव तसचं एखद्या तारखेशी संबंधित गोष्टी लक्षात ठेवण्यास कठीण जातं. मात्र काही गोष्टींमध्ये मी परफेक्ट आहे. मला अनेक गोष्टी माझ्या गाडीच्या डिक्कीत ठेवायला सांगा. मी ते सर्व योग्यरित्या करू शकतो. मी काही गोष्टींमध्ये उत्तम आहे तर काहींमध्ये वाईट. या गोष्टी सुधारण्याचा मी सतत प्रयत्न करतोय.” असं अनिभन पोस्टमध्ये म्हणालाय.

याच आजारावर बॉलिवूडमध्ये ‘तारे जमीन पर’ हा सिनेमा आला होता.या सिनेमात अभिनेता दर्शिल सफारीला हाच आजार असल्याचं दाखवण्यात आलंय. ज्यामुळे त्याला अंक आणि अक्षरं लक्षात ठेवणं कठीणं जातं असतं. खास करून अगदी कमी वयातच या आजाराची लक्षणं दिसू लागतात.