अभिनय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या राजकीय कारकिर्दीला कधीपासून सुरुवात करणार असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच रजनीकांत यांच्या भावाने म्हणजे सत्यनारायण राव गायकवाड यांनी याविषयीचा एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. राजकारणातील नव्या इनिंगची आणि राजकीय पक्षाची घोषणा रजनीकांत पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

धर्मपुरी येथे बोलताना त्यांनी याविषयीची घोषणा केली. त्यामुळे रजनीकांत यांना राजकारणातील प्रवेशाविषयीच्या बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या हालचाली आणि रजनीकांत यांनी काही सभा, कार्यक्रमांमध्ये केलेली वक्तव्ये पाहता त्यांचा राजकारणातील प्रवेश अनेकांनाच अपेक्षित होता. पण, ते नेमके कोणत्या पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार हे स्पष्ट होत नव्हते. पण, आता जानेवारी महिन्यात रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

वाचा : या चित्रपटातून रजनीकांत यांची मराठीत एन्ट्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत ‘२.०’ आणि ‘काला’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण, त्यानंतर त्यांच्या हाती कोणतेच प्रोजेक्ट नसल्याचेही म्हटले जातेय. तेव्हा आता कलाविश्वाला रामराम ठोकून सुपरस्टार रजनी नव्या इनिंगची सुरुवात नेमकी कोणत्या मुहूर्तावर करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.