सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्ण भगवानला मानले जाते. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक कलाकारांनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर यांनी जन्माष्टमीच्या उर्दूमध्ये शुभेच्छा दिल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

सचिन यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टमध्ये त्यांनी उर्दू शेर शेअर केला आहे. ‘जन्माष्टमी मुबारक हो… अगर किशन की तालीम आम हो जाए, तो काम फितनागरों का तमाम हो जाए’ हा मौलाना जफर अली खान यांचा शेर शेअर केला होता.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

आणखी वाचा : सलमान खानच्या चित्रपटासाठी शशी थरुर यांना मिळाली होती ऑफर, पण…

पण सचिन पिळगावकर यांनी उर्दूमध्ये शुभेच्छा देणे नेटकऱ्यांना पटले नाही. नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले असून मराठीचे धडे दिले आहेत.

एका यूजरने ‘कट्यार नक्की काळजात घुसली की मेंदूत?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘सर मराठी भाषा विसरले की काय… नाही मराठी बोलू शकत तर हिंदी भाषेचा वापर तरी करु नका’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘पिळगावकर, तुम्ही कट्यारमध्ये मुस्लिम गायकाची भूमिका केलीत, त्या भूमिकेतून बाहेर या आणि कुणाचेही दाखले देऊ नका’ असे म्हणत निशाणा साधला आहे.