काळवीट शिकार प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानला शुक्रवारी जोधपुर जिल्हा न्यायालय न्यायाधीशांसमोर हजर राहावे लागणार आहे. वैयक्तिक जातमुचलक्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी त्याला न्यायालयात जावे लागणार असून, त्याला २० हजार रुपये जमा करावे लागणार आहेत.

चित्रपटसृष्टीची ‘चायनीज गुडिया’ ते किशोर कुमार यांची चौथी पत्नी, असा होता या अभिनेत्रीचा प्रवास

mira bhaindar riot case marathi news, mira bhaindar violence marathi news
मिरा-भाईंदर येथील दंगलीनंतरचे प्रक्षोभक भाषणाचे प्रकरण : आमदार नितेश राणे आणि गीता जैनविरोधात गुन्हा
major anuj sood marathi news, major anuj sood latest marathi news
शहीद जवानाच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्याचे प्रकरण : मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही हे सरकारने प्रतिज्ञापत्रावर सांगावे, उच्च न्यायालयाचे ताशेरे
Hindu Marriage Act
“हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
supreme-court_
मदरसा कायदा रद्द करण्यास अंतरिम स्थगिती; अलाहाबाद उच्च न्यायालयाने चुकीचा अर्थ लावला- सर्वोच्च न्यायालय

जानेवारीमध्ये त्याची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केल्यानंतर राज्य सरकारने मार्चमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाकडे पुन्हा अपील केले होते. ज्यासाठी सलमानला आज न्यायालयात हजर राहावे लागेल. याशिवाय सलमान खानला २० हजार रुपयांचा जातमुचलका भरावा लागणार आहे. गेल्यावेळी सलमानच्या पोलीस संरक्षणचा मुद्दा पुढे करत त्याच्या वकिलाने तो हजर राहू शकत नसल्याचे सांगितले होते.

‘हम साथ साथ है’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान कंकणीजवळ सलमानने चिंकारा आणि काळवीटची शिकार करताना अमेरिकन बनावटीची रिव्हॉल्वर आणि बंदुकीचा वापर केल्याचा आरोप त्याच्यावर त्याच्यावर होता. पण सलमान विरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

काही महिन्यांपूर्वी हिट अॅण्ड रन प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला होता. २००२ मध्ये सलमाने मद्यधुंद अवस्थेत वांद्रे येथे पदपथावर झोपलेल्या चार जणांना चिरडले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता.

सुनील पालच्या आरोपांनंतर भडकले ‘मुबारका’चे दिग्दर्शक अनीस बाज्मी