अभिनेत्री महिमा चौधरी रविवारी आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी गेली होती. यावेळी तिची मुलगी आर्यनासुद्धा तिच्यासोबत होती. मात्र एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या महिमाला तिच्या वाढलेल्या वजनामुळे लोकांनी सुरुवातीला ओळखलेच नाही. मुलीबरोबर फिरून आधी तिने संपूर्ण ताजमहाल पाहिला. मात्र परतत असताना तिला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

खरेतर आग्रा येथे आयोजित केलेल्या ‘मिस आग्रा फॅशन शो’साठी ती सेलिब्रिटी परिक्षक म्हणून तेथे गेली होती. या शोनंतर ती हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये एका लग्नातदेखील सहभागी होणार होती. आग्र्याला गेल्यानंतर ताजमहालला भेट देण्याचा मोह महिमाला आवरला नाही. म्हणून आपल्या मुलीसोबत ती तेथे गेली. आता बरीच जाड झाल्याने तिला सुरुवातीला कोणीही ओळखू शकले नव्हते. पण परतताना लोक तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करू लागले. या गर्दीतून नंतर सुरक्षारक्षकांनी तिला बाहेर आणले.

mahima-chaudhary

वाचा : …म्हणून सोनमला आला रणबीरचा राग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी महिमा म्हणाली की, ‘मला पूर्वी कधीही एवढी मजा आली नाही. जीवनात एवढा आनंद कधीही मिळाला नव्हता.’ काही दिवसांपूर्वी महिमा चौधरीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फारशी पार्ट्यांमध्ये न दिसणारी महिमा नुकतीच एका कार्यक्रमालाही हजर राहिली होती. वाढलेल्या वजनामुळे या फोटोंमध्ये तिला ओळखणेही कठीण झाले होते.