अलिकडेच प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया याचं नाव ड्रग्स प्रकरणी समोर आलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर भारतीविषयी अनेक चर्चा रंगत आहेत. अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. मात्र, या प्रकरणानंतर भारती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने आदित्य नारायण व श्वेता अग्रवाल यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. या लग्नसोहळ्यात भारती डान्स करताना दिसून आली. त्यामुळे आता नेटकऱ्यांमध्ये भारतीविषयी हा नवा मुद्दा चर्चेत आला आहे.
सध्या सोशल मीडियावर आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नातील काही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये भारतीचादेखील एक व्हिडीओ आहे. यात भारती डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आदित्य- श्वेताच्या रिसेप्शन पार्टीतला आहे. यामध्ये भारती आणि हर्ष सहभागी झाले आहेत. यात हर्ष व भारती पार्टी एन्जॉय करत असून ते फोटो काढताना दिसत आहेत. तसंच भारतीने एका गाण्यावर ठेकादेखील धरला आहे. भारतीचं नाव ड्रग्स प्रकरणी समोर आलं असून सध्या तिची जामिनावर सुटका झाली आहे.
आणखी वाचा- कृष्णा अभिषेकचा भारती सिंहला पाठिंबा; म्हणाला…
दरम्यान, आदित्य नारायण व श्वेता अग्रवाल या दोघांचं नुकतंच लग्न झालं आहे. जवळपास ११ वर्ष ही जोडी एकमेकांना डेट करत होती. त्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या संमतीने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.