मराठी सिनेसृष्टीतील नटसम्राट नाना पाटेकर आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार थलायवा रजनीकांत हे पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर येणार आहेत. रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षीत ‘काला करिकालन’ या सिनेमात नाना पाटेकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नाना सिनेमात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे सिनेमात रजनी विरुद्ध नाना असे अनेक सीन पाहायला मिळतीय यात काही शंका नाही. अभिनयाच्या या दोन बादशहांना आता एकमेकांसमोर पाहायला त्यांचे चाहते फार उत्सुक झाले आहेत.

रणबीरला फक्त ५००० रुपये देण्यासही शाहरुखचा नकार

काही आठवड्यांपुर्वीच या सिनेमासाठी नानांची निवड करण्यात आली. या सिनेमात नाना एका दुष्ट राजकारण्याची भूमिका साकारताना दिसतील. तर रजनीकांत त्यांचा कट्टर विरोधक असणार आहे. दोघांमधील ही जुगलबंदी पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल हे मात्र नक्की.
नुकतेच रजनीकांत यांनी मुंबईतील या सिनेमाचे दोन आठवड्यांचे चित्रीकरण पूर्ण केले आणि ते चेन्नईला परतलेही. पण सिनेमाच्या पुढील भागाचे चित्रीकरण करण्यासाठी ते पुन्हा मुंबईत येणार असल्याचे बोलले जात आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

‘कबाली’चे दिग्दर्शक पा. रंजीत या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. तर रजनीकांत यांचा जावई धनुष याने सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात हुमा कुरेशी, अंजली पाटील आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. पंकज त्रिपाठी सिनेमात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे.

नवाझुद्दीनच्या ‘बाबुमोशाय बंदुकबाझ’चा ट्रेलर प्रदर्शित

नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी रजनीकांत यांची भेट घेतली होती. अमृता या प्रशिक्षित गायिका आहेत आणि काला या सिनेमात गाणं गाऊन त्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.