नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये आपल्या मेहनतीने आणि अप्रतीम अभिनयाने एकापेक्षा एक साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. नवाजचा नवीन सिनेमा येणार म्हणजे पुन्हा एकदा त्याचा दमदार अभिनय पाहताय येणार अशीच काहीशी प्रेक्षकांची आशा असते. नवाजचा आणखी एक नवीन सिनेमा बाबुमोशाय बंदुकबाझ येतोय. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

Gurugram Gangrape: नरेंद्र मोदींना टॅग करुन अरिजीत सिंगने विचारले, कसे रोखणार बलात्कार?

‘गँग्स ऑफ वासेपुर’ पासून सुरू असलेली घोडदौड कायम राखत नवाजुद्दीनने आपलं नाणं कसं खणखणीत आहे हे प्रत्येक सिनेमातून दाखवून दिलं आहे. आता अशीच एक मध्यवर्ती भूमिका असलेला हा त्याचा सिनेमा आहे. टीझरवरून हा सिनेमा नक्कीच वेगळा असणार हे दिसतं.

निर्माते प्रितीश नंदी यांचा मुलगा कुशल नंदीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात नवाज हा बाबू नावाच्या छोटेखानी काँट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेसाठी खूद्द जेम्स बाँडच्या व्यक्तिरेखेपासून प्रेरणा घेतल्याचे नवाजने एका मुलाखतीत सांगितले होते. नवाजसोबत या सिनेमात दिव्या दत्ता, बिदिता बाग, मुरली शर्मा, जतिन गोस्वामी, श्रद्धा दास, अनिल जॉर्ज, जीतू शिव्हारे, भगवान तिवारी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या तारखेला विवाह बंधनात अडकणार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य

सिनेमात नवाजसोबत ताहिर भसीनही दिसणार आहे. ताहिरने याआधी ‘फोर्स २’ मध्ये काम केले होते. हा सिनेमा याआधी २०१६ मध्ये प्रदर्शित होणार होता. पण काही कारणांमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.