७१ व्या ‘कान महोत्सवा’मध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यांमध्ये दरवेळेप्रमाणेच बच्चन कुटूंबियांची सून ऐश्वर्या हिनेही बाजी मारली. ‘कान’ महोत्सवामध्ये ऐश्वर्या तिच्या लूकमुळे कायमच चर्चेत असते. यावेळी देखील तिने परिधान केलेल्या पिकॉक गाऊनमुळे ती चर्चेत आली. विशेष म्हणजे यावेळी ऐश्वर्या आपल्या लहान मुलीला म्हणजेच आराध्याला सोबत नेले होते. मात्र आता ‘कान’मधील हे ऐश्वर्य भारतात परतले आहे.

‘कान’ महोत्सवात सहभागी होण्याचे ऐश्वर्याचे हे १७ वे वर्ष आहे. दरवेळी ऐश्वर्या ‘कान’च्या रेडकार्पेटवर आपला जलवा दाखवते. ‘कान’मध्ये तिने केलेल्या प्रत्येक फॅशनची चर्चा प्रदीर्घ काळापर्यंत चालू असते. अगदी तिने लावलेल्या लिपस्टीकपासून ते केसांच्या हेअरस्टाईलपर्यंत या विश्वसुंदरीचीच चर्चा असते.

aradhya
ऐश्वर्या -आराध्या

 

दरम्यान, यावेळी तिच्या फॅशनबरोबरच मुलगी आराध्यामुळे चर्चेत आली आहे. ‘कान’च्या रेड कार्पेटवर आराध्याही लाल रंगाच्या सुरेख ड्रेसमध्ये झळकली होती. मात्र आता या दोन्ही माय-लेकींनी ‘कान’ महोत्सव आटोपून घरी परतल्या आहेत.

वाचा :‘बिग बॉस’फेम रेशमविषयीच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

‘कान’च्या कार्पेटवर आराध्याही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये झळकली होती. मात्र आता या दोन्ही माय-लेकींनी ‘कान’ महोत्सव आटोपून घरी परतल्या आहेत. अॅश-आराध्या घरी परतत असताना काही छायाचित्रकारांनी दोघा मायलेकींना फोटोमध्ये कैद केले आहे. यावेळी काढण्यात आलेल्या फोटोमध्ये अॅशने काळ्या रंगाच्या डेनिमनचे कॅज्युअल कपडे घातले होते. तर आराध्यानेही पॅपी पिंक रंगाचा ड्रेस घातल्याचे दिसून आले. यावेळी आराध्याच्या चेहऱ्यावर घरी परतत असल्याचा आनंद दिसत होता.

ऐश्वर्या कायमच आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून आता आराध्याही आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसून येत आहे.