‘संजू’, ‘थ्री इडियट्स’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ यांसारख्या दमदार चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी मराठी चित्रपट ‘चुंबक’ची भरभरून स्तुती केली. अक्षय कुमार प्रस्तुत हा चित्रपट त्यांनी नुकताच पाहिला. ‘चुंबक’ हा चित्रपट हृदयाला भिडतो आणि त्यातल्या प्रत्येक कलाकाराने उत्तम काम केले आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं आहे.
‘स्वानंद किरकिरे यांना आपण एक उत्तम गीतकार म्हणून जाणतोच. पण या चित्रपटातून ते एक उत्तम कलाकार असल्याचंही सिद्ध झालं आहे. सौरभ भावे यांनी एक छान कथा लिहिली असून त्याला संदीप मोदी यांचे प्रगल्भ दिग्दर्शन लाभले आहे. साहिल जाधव आणि संग्राम देसाई या नवोदितांनी उत्तम काम केलं आहे. या चित्रपटाची जबाबदारी उचलल्याबद्दल नरेन कुमार आणि अक्षय कुमार यांना माझा सलाम,’ असं ट्विट हिरानी यांनी केलं आहे.
Saw a heart warming Marathi film. Chumbak. @swanandkirkire is not only a great lyricist but a great actor too. sweet story by @saurabhave. matured direction by @sandeep_modi. Lovely Kids Sahil Jadhav and Sangram Desai. Salutes @jollynarenkumar @akshaykumar for supporting it
— Rajkumar Hirani (@RajkumarHirani) July 24, 2018
वाचा : टायगर श्रॉफनं घेतलं आठ बेडरुम्सचं आलिशान घर
‘चुंबक’ हा चित्रपट २७ जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले प्रख्यात गीतकार आणि गायक स्वानंद किरकिरे पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असून प्रमुख भूमिका असलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.