बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांची मुलं प्रसारमाध्यमांमध्ये नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असतात. या स्टार किड्सची फॅशन, त्यांची स्टाइल स्टेटमेंट, ते कुठे फिरायला जातात या सर्व गोष्टी त्यांच्या चाहत्यांना माध्यमांद्वारे कळत असतात. म्हणूनच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर यांची नेहमीच चर्चा असते. मात्र या सर्वांमध्ये असेही काही स्टार किड्स आहेत ज्यांना प्रसारमाध्यमांमध्ये झळकणं, कॅमेरांमध्ये टिपलं गेलेलं आवडत नाही. बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा मुलगा आरव सध्या याच कारणांमुळे चर्चेत आहे.

अक्षय आणि ट्विंकलचा मुलगा आरव सहसा कॅमेरांसमोर येत नाही. जर कधी तो आलाच तरी तो नेहमीच चेहरा लपवताना पाहायला मिळतो. नुकताच आरव आई-वडिलांसोबत एका कार्यक्रमासाठी बाहेर पडला आणि कॅमेरांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने एक नवीन शक्कल लढवली. कॅमेराचे फ्लॅशलाइट्स चेहऱ्यावर न पडण्यासाठी त्याने इन्जनियस जॅकेट ingenuous jacket घातलं होतं.

 

Ribbon Trailer: नात्यांना बांधून ठेवणारा ‘रिबन’

या जॅकेटचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये असणारे नॅनो स्फेरीकल क्रिस्टल्स कॅमेरा लाइट्स अडवतात आणि त्यामुळेच नीट व्हिडिओ किंवा फोटो काढता येत नाहीत. हे जॅकेट घालून आरव फोटोग्राफर्सपासून त्याचा चेहरा लपवण्यात यशस्वी ठरला. आपल्या मुलाने लढवलेली ही शक्कल पाहून अक्षयलाही हसू अनावर झालं.