आलिया भट्ट जेवढी शांत वाटते तेवढीच ती अवतीभोवती काही अयोग्य झालं तर चिडतेही. ती फार संवेदशील आहे. तिला प्राण्यांबद्दल नित्सिम प्रेम आहे. ती स्वतः प्राण्यांशी निगडीत अनेक संस्थांसोबत त्यांना वाचवण्याचे काम करते. मुक्या प्राण्यांवर अत्याचार झालेले ती सहनच करु शकत नाही.
…म्हणून सलमान खानच्या घरी यावर्षी बाप्पा येणार नाही
आलियाची मोठी बहिण आणि अभिनेत्री पूजा भट्टने प्राण्यांशी निगडीत एका बातमीचे ट्विट केले. यात तिने लिहिले की, एका व्यक्तीने विटेने मारुन झोपलेल्या कुत्र्याला मारून टाकले. एवढं करून तो थांबला नाही तर त्याने हे करतानाचा व्हिडिओही रेकॉर्ड केला. आलियाने या ट्विटला रिट्विट करत आपला राग व्यक्त केला. आलियाने लिहिले की, ‘हे पाहून मी फार बैचेन आहे. हे काय चाललंय? कोणतीही व्यक्ती असे कसे करु शकते? हा गुन्हा आहे आणि त्या व्यक्तीला कठोर शिक्षा मिळायलाच हवी.’
What the hell is this????? I am shocked!!!! How can people do this? This is a crime! I am disgusted!!! This demands severe punishment! https://t.co/qi6ZAH039u
— Alia Bhatt (@aliaa08) August 18, 2017
काही दिवसांपूर्वी आलियाने पर्यावरणाशी निगडीत ‘को एक्झिस्ट’ नावाचा उपक्रम सुरू केला आहे. तसेच ‘मदर्स डे’च्या दिवशीही तिने एका कासवाचे प्राण वाचवत त्याला समुद्रात सोडले होते. एवढेच नाही तर ती गल्लीतील कुत्रे, मांजरी यांचीही होईल तशी मदत करत असते. आलियाला पर्यावरण आणि प्राण्यांबद्दल जनतेमध्ये अधिकाधिक जागरुकता निर्माण करायची आहे.
आपल्या या उपक्रमाबद्दल बोलताना आलियाने एका मुलाखतीत सांगितले की, ‘भटके कुत्रे, मांजर यांच्यासोबत अनेकदा क्रुरपणे वागले जाते. रस्त्यावर राहत असल्यामुळे ते सुरक्षित नाहीत. त्यांचे कोणतेही सुरक्षित असे घर नाही. अनेकदा वाहन चालकांमुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागतात. सण- उत्सवांच्या दिवसांमध्ये लाउडस्पीकर आणि फटाक्यांच्या आवाजामुळे त्यांना फार त्रास सहन करावा लागतो. आमच्या या उपक्रमामुळे लोकांच्या वागणुकीत काही बदल होईल अशी मला आशा आहे.’
