आमिर खानचा भाऊ फैजल खानने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलंय. अभिमनयासोबत आता फैजल दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फॅक्टरी ३’ या सिनेमाचं फैजलने दिग्दर्शन केलं असून तो या सिनेमात मुख्य अभिनेत्याच्या रुपात झळकणार आहे.

फैजल खानने ईटीटाइम्सला नुकत्यात दिलेल्या मुलाखतीत त्याच्या करिअरसोबतच नातेसंबधांवर चर्चा केली. आमिरसोबत असलेल्या नात्यावर फैजल म्हणाला, ” आमिर खान आमच्या कुटुंबातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहे. मात्र या सिनेमानंतर आता लोक मलाही एक अभिनेता, दिग्दर्शक आणि गायक म्हणून ओळखू लागतील. मी माझ्या सिनेमांमधून स्वत:ला सिद्ध करणार आहे.” असं फैजल म्हणाला. यावेळी लग्नाविषयी विचारलेल्या प्रश्नावर फैजलने मजेशीर उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, “बायको परवडण्यासाठी मी पुरेसे पैसै कमावलेले नाहीत. माझी कुणी गर्लफ्रेण्डही नाही कारण यात तर खूपच पैसे खर्च होतात आणि बायकोतर अजूनच महागात पडते” असं फैजल म्हणाला.

police reaction on Gurucharan Singh missing
गुरुचरण सिंग बेपत्ता असण्याबद्दल पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सीसीटीव्हीत जे दिसतंय त्यानुसार ते…”
Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री

हे देखील वाचा: शिक्षा नव्हे तर सलमान खानला विमानतळावर अडवणाऱ्या त्या CISF जवानाला मिळालं बक्षिस

 

View this post on Instagram

 

A post shared by Faissal Khan (@faissal.khan)

हे देखील वाचा: “रणवीर सिंह बाबा झाला”; चाहत्याच्या प्रश्नावर परिणीती च्रोपाने दिलं ‘हे’ उत्तर

यावेळी तो म्हणाला, “सिनेमा हिट असेल तर मुलगी पाहणं सुरु करा.”या मुलाखतीत फैजलला आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर फैजल म्हणाला, “माझं स्वत:च पहिलं लग्न टिकलेलं नाही त्यामुळे मी त्यांच्या खासगी आयुष्यावर काही बोलू शकत नाही.” असं उत्तर फैजलने दिलं आहे.

फॅक्टरी ३’ हा सिनेमा ३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या आधी फैजलने ‘मेला’, ‘चिनार दास्तान’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमांमध्ये काम केलंय. मात्र अभिनय क्षेत्रात त्याला फारसं यश मिळालं नाही.