करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे वृत्त काल वाऱ्यासारखे पसरले. सुदैवाने अपघातात त्यांना काहीही न झाल्याचे ‘पीटीआय’ने म्हटले होते. गेल्या आठवड्यात कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उदघाटनाला बिग बी यांनी उपस्थिती लावली होती. शनिवारी सकाळी मुंबईला परतण्यासाठी ते विमानतळावर जात असताना ही घटना घडली. त्यांच्या मर्सिडीज गाडीचे मागचे चाक अचानक निखळल्याचे वृत्त होते. पण, अमिताभ यांनी नुकतेच केलेले ट्विट पाहता असे काही घडले नसल्याचे समजते.
वाचा : ‘पद्मावती’चे तिकीट काढण्यापूर्वी विमा काढा; फेसबुकवरून धमकी
अमिताभ यांनी गुरुवारी रात्री त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून असा कोणताही अपघात झाला नसल्याचे म्हटले. तसेच, ते सुखरुप असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘कोलकत्यात झालेल्या अपघातामध्ये माझे प्राण जरासाठी बचावल्याचे हितचिंतक आणि माध्यमांकडून मला कळले. पण हे वृत्त चुकीचे आहे. असा कोणताही अपघात झालेला नाही. मी सुखरुप आहे’, असे बिग बीनी ट्विटमध्ये म्हटले.
Dhadak photos: बॉलिवूडमधील आर्ची-परश्या
या अपघाताच्या वृत्तानंतर, मोठी रक्कम मोजूनही अमिताभ यांच्यासाठी करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थेत बेजबाबदरपणे वागणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीविरोधात राज्य सरकार कारवाई करणार असल्याचे कोलकाता वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याने म्हटले होते. कारचे आयुर्मान संपले असतानाही तिचा वापर केला जात असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले होते.
T 2713 – I am informed by concerned well wishers and media, that I had a close escape from a car accident in Kolkata .. that is incorrect .. there has been no accident .. I am well .. pic.twitter.com/FLUnlRiIH6
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 16, 2017