‘पद्मावती’ चित्रपटाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यप्रदेशमध्ये संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटाला होणारा विरोध अधिक तीव्र झाला आहे. चित्रपटाला विरोध करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळत असून, दीपिका आणि भन्साळी यांना धमक्याही दिल्या जात आहेत. भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला पाच कोटींचे बक्षिस जाहीर करण्यात आलेय. इतकेच नाही तर चित्रपटाची तिकीट काढण्यापूर्वी तुमचा विमा काढा, अशा आशयाची पोस्टही फेसबुकवर व्हायरल होत आहे.

Inside Photos : ..अशी होती आराध्याची बर्थडे पार्टी

राजपूत सेनेच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘पद्मावती चित्रपटाची तिकीट काढण्यापूर्वी स्वतःचा विमा काढून घ्या. कारण, राजपूत शिरच्छेद करताना विचार करत नाहीत.’ होशंगाबाद जिल्ह्यातील या ग्रुपने आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांनाही चित्रपट न बघण्याची धमकी दिली आहे.

फ्लॅशबॅक : मुहूर्तावर दिग्दर्शकाचा ठसा…

भाजप कार्यकर्ते आणि काही समूहांनी गुरुवारी ग्वाल्हेर येथील एका मल्टिप्लेक्स बाहेर चित्रपटाविरोधात निषेध केला. निषेध करणारे लोक चित्रपटाचा प्रोमो पाहण्यासही तयार नव्हते. देशातील अनेक हिंदू आणि राजपूत संघटना ‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध करत आहेत.