बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून कामापेक्षा त्याच्या मुलांमुळेच अधिक चर्चेत आला आहे. गोंडस तैमुरचे फोटो सर्वांचेच लक्ष वेधत असताना त्याची मोठी मुलगी सारा अली खान हिच्या बॉलिवूड पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पण, आपल्या मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी सैफ काही खूश नसल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच त्याविषयी सैफने केलेल्या वक्तव्यामुळे त्याने पहिली पत्नी अमृता सिंग हिचा रोष ओढावून घेतल्याचे चित्र आहे.

वाचा : …आणि रणबीर- कॅटमधीत मतभेद ‘त्या’ मुलाखतीत आले सर्वांसमोर

‘डीएनए’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफने म्हटलेलं की,  ‘तिला हा पर्याय का हवा आहे काय ठाऊक. न्यूयॉर्कमध्येच राहून त्या ठिकणीच काम करण्याला तिने प्राधान्य का दिलं नाहीये ते कळत नाही? अभिनय क्षेत्राकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीकोनाचा अजिबात गैरसमज करुन घेऊ नका. पण, करिअरमध्ये स्थैर्य असणं कधीही महत्त्वाचं असतं. इथे तर प्रत्येकजण एक प्रकारच्या चिंतेत असतो. किंबहुना कधीकधी तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करुनही यशस्वी व्हाल याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे हे असं आयुष्य आपल्या मुलांनी जगावं असं कोणत्याच पालकांना वाटणार नाही.’ यावर रागावलेल्या अमृताने सैफला फटकारल्याचे वृत्त आता आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘सारा तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्याच्या तयारीत असताना तुझे असे म्हणणे बेजबाबदारपणाचे आहे’, असे अमृताने सैफला सुनावले. पण, सैफला कोणत्याही वादात अडकण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने मी ते सहजच बोललो होतो, असे म्हणत आपल्या पहिल्या पत्नीला शांत केल्याचे म्हटले जातेय.

वाचा : श्वेता तिवारीच्या मुलीने सनीच्या मुलाला दिला नकार

त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा सैफला साराविषयी प्रश्न करण्यात आला. त्यावेळी मात्र सैफने सावध खेळी खेळणे पसंत करत म्हटले की, माझं माझ्या मुलीवर प्रेम आहे. तुम्ही तिला पाठिंबा द्या आणि तिने केलेली निवड योग्य असल्याचे  मला वाटते. ती एक अभिनेत्री असून कलाकारांच्या घराण्याशी तिचा संबंध आहे. पण, तरीही मला तिची चिंता वाटते कारण हे क्षेत्र तितकं स्थिर नाही. माझं तिझ्यावर खूप प्रेम असल्यामुळे मला तिची काळजी वाटते. मी सध्या इतकंच बोलू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारा अली खान लवकरच सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत केदारनाथ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. चित्रकरणापूर्वी सारा आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी केदारनाथाचा आशीर्वाद घेतला. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.