‘बाहुबली २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. दिग्दर्शक राजामौली यांची जादू संपूर्ण देशभर पसरली. आजही काही भागांमध्ये ‘बाहुबली २’ सिनेमा दाखवण्यात येतो. जगभरात या सिनेमाने १७०० हून अधिकची कमाई केली. तुमच्यापैकी अनेकांनी हा सिनेमा एकापेक्षा जास्त वेळा पाहिला. पण तरीही तुम्हाला त्यातल्या चुका लक्षात आल्या नसतील. म्हणूनच आम्ही तुम्हाला ‘बाहुबली २’ मधील अशी एक मोठी चूक दाखवणार आहोत जी पाहून तुम्हीही विचारात पडाल.
एक माणूस माझ्या आयुष्यात आला आणि अर्ध्यावर निघून गेला.. बास एवढंच झालं- जेनिफर विंगेट
या सिनेमातील ती चूक एवढी मोठी आहे की ती चूक जर सिनेमा बनवताना लक्षात आली असती तर हा सिनेमाच पूर्ण होऊ शकला नसता. तुम्हाला शिवगामी देवी जेव्हा देवसेनेला लग्नाची मागणी घालण्यासाठी कुंतल राज्यात आपल्या एका माणसाकरवी भल्लालदेवची तलवार पाठवते, तो सीन आठवतो का?
महिष्मती राज्यातला तो सेवक कुंतल राज्यात जातो आणि राजमाता शिवगामी देवीच्या मुलासाठी देवसेनेला लग्नाची मागणी घालतो. त्यातील एक सेवक मागे भल्लालदेवची तलवार घेऊन उभा असतो.
या दृश्यात खांबाच्या मागे उभा राहून कटप्पा हे सर्व संभाषण ऐकत असतो.
राजमातेची ही मागणी ऐकून कटप्पा आनंदीत होतो. कटप्पाला वाटतं की राजमातेने बाहुबलीची तलवार देवसेनेसाठी पाठवली आहे. कटप्पा ही गोष्ट खुद्द बाहुबलीलाही सांगतो.
पण थांबा नेमकी इथेच दिग्दर्शकाने मोठी चूक केली आहे. बाहुबली स्वतःची तलवार प्रवासात घेऊनच आलेला असतो. तर मग राजमाता बाहुबलीची तलवार भेट म्हणून कशी देईल? बाहुबली त्याच तलवारीने अनेकांशी लढताना दाखवले आहे.
कटप्पाचं सोडा पण स्वतः बाहुबलीलाही ते खरं कसं वाटलं? शिवगामीने पाठवलेली तलवार त्याची कशी असू शकते जर त्याची तलवार तो नेहमीच स्वतः सोबत ठेवतो. तुम्हाला आता तरी कळली का ही चूक?