‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यापैकीच गाजलेली भूमिका म्हणजे कटप्पाची. सत्यराज यांनी साकारलेल्या कटप्पाच्या भूमिकेला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली होती. माहिष्मती साम्राज्याच्या सेनापतीची भूमिका साकारणारे कटप्पा आता जनतेचं रक्षण करताना पाहायला मिळणार आहेत. आगामी चित्रपटात ते एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत.

‘हॉन्टेड रेडिओ रूम’ या तामिळ थरारपटात ते झळकणार आहेत. ‘कालाप्पदम’ या गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शक वेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. उत्तम थरारपटांसाठी त्यांची ओळख आहे. या चित्रपटाबद्दल ते म्हणाले की, ‘एखाद्या चित्रपटाच्या यशासाठी त्यातील कास्टिंग तितकीच महत्त्वाची असते. जेव्हा सत्यराज यांनी भूमिकेला होकार दिला तेव्हाच मला माझे 50 टक्के काम पूर्ण झाल्यासारखे वाटले. माझ्या मते, त्यांच्याशिवाय दुसरे कोणीच ही भूमिका साकारू शकत नाही.’

Happy Birthday Javed Akhtar : ‘कुछ कुछ होता है’ गाण्याचा हा भन्नाट किस्सा ऐकलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा थरारपटाची कथा एफएम रेडिओ स्टेशनवर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले. रेडिओ स्टेशनवर एका रात्री घडलेल्या असामान्य घटनेपासून कथेची सुरुवात होते. कथेच्या गरजेनुसार सेट न उभारता एका रेडिओ स्टेशनवरच या चित्रपटाची शूटिंग होणार आहे. या तामिळ चित्रपटात इतर कोणते कलाकार झळकणार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सत्यराज यांची भूमिका निश्चित झाल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.