अभिनेता प्रभास Prabhas हा सध्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय बनला आहे. ज्या ज्या व्यक्तींनी ‘बाहुबली’ Baahubali पाहिलाय ते सर्वजण या अभिनेत्याचे लूक्स आणि त्याची शरीरयष्टी यांच्या जणू प्रेमातच पडले आहेत. प्रभास आता केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हिरो नाही तर देशभरातील चाहत्यांसाठी जणू मेगास्टार बनला आहे. प्रभासचे अनेक तेलगु चाहते त्याच्या लग्नाच्या बातमीकडे डोळे लावून बसले आहेत. टॉलिवूडच्या या हॅण्डसम हंकसोबत लग्न करणारी ती नशीबवान मुलगी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

वाचा : प्रभासशी लग्नाबद्दल अनुष्का म्हणते की….

Fraud, Fraud with youth,
प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणाची दीड लाखांची फसवणूक
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
नाव उलटून सहा मृत्युमुखी; झेलम नदीतील दुर्घटना, बहुसंख्य शाळकरी मुलांचा समावेश
Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन

‘बाहुबली २’ प्रदर्शित होण्यापूर्वी प्रभासची होणारी बायको भीमावरम येथील असल्याची अफवा पसरली होती. तिचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका ऑडिओ कार्यक्रमात प्रभासचे काका कृष्णम राज यांनी या सर्व वृत्तांना धुडकावून लावले. ‘बाहुबली २’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रभास लग्न करेल असे संकेत त्यांनी त्यावेळी दिले होते. त्यानंतर आठवड्याभरापूर्वीच प्रभास आणि ‘बाहुबली’तील त्याची सहकलाकार अनुष्का शेट्टी anushka shetty हे लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. त्यासाठी काही रितीरिवाजही पूर्ण केल्याची चर्चा होती. पण, ही अफवा फार काळ टिकली नाही. काही दिवसांमध्येच या दोघांच्याही चाहत्यांना असं काहीही नसल्याचं कळलं.

वाचा : बॉक्स ऑफिसवर ‘दंगल’ने ‘बाहुबली २’लाही टाकले मागे!

कटप्पाने बाहुबलीला का मारले? यानंतर आता प्रभासचं लग्न कधी होणार? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे सगळेच प्रभासच्या लग्नाच्या मागे लागले आहेत. आता प्रभासच्या भावी पत्नीसाठी आणखी एक नाव समोर आले आहे. रासी सिमेंट इंडस्ट्रियालिस्टच्या अध्यक्षांच्या नातीशी प्रभासच्या लग्नासाठी बोलणी सुरु असल्याची चर्चा आहे. नुकतीच दोन्ही कुटुंबांची भेट झाली असून, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या दोन्ही कुटुंबाची भेट लग्नाच्या बोलणीसाठी होती की व्यावसायिक होती हे मात्र कळलेले नाही. प्रभासच्या लग्नाचे हे वृत्त तरी खरे आहे की नाही हे येणारी वेळच सांगेल.