एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २ द कनक्लुजन’ प्रदर्शित होऊन ५० दिवस उलटले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात १०५० कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. या चित्रपटाच्या यशाने सर्वाधिक आनंद कोणाला झाला असेल तर तो अर्थातच बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहर आहे. ‘बाहुबली’च्या Baahubali दोन्ही चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनची निर्मिती आणि वितरण करणाऱ्या करण जोहरने एका पार्टीचे Karan Johars party आयोजन केले होते. तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या प्रभास आणि राणी डग्गुबती या दोन हॅण्डसम हंक्सना त्याने पार्टीला आमंत्रित केलेले. सोमवारी संध्याकाळी उशिरा ‘बाहुबली’ म्हणजेच प्रभास Prabhas आणि ‘भल्लालदेव’ म्हणजेच राणा डग्गुबती यांनी करणच्या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीला आलिया भट्ट, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि इतरही काही सुपरस्टार सेलिब्रिटी उपस्थित होते.

PHOTO : जुळ्या वाटतील अशा मराठी अभिनेत्री आणि त्यांच्या बहिणी

यावेळी करणच्या घरात वरुणने Varun Dhawan चक्क प्रभासचा ‘वध’ केला. पण हे काही खरंखरं घडलं नाही. करण जोहरची पार्टी म्हटल्यावर मजामस्ती तर होणारच. वरुण धवनने ‘बाहुबली’मधील एक दृश्य प्रभाससोतब रिक्रिएट केले. कटप्पाने बाहुबलीच्या पाठीत तलवार खुपसल्याचे दृश्य चित्रपटातील सर्वाधिक प्रसिद्ध सीन आहे. त्यामुळेच तर या चित्रपटाबद्दल लोकांची अधिकाधिक उत्सुकता वाढली होती. चित्रपटातील दृश्याप्रमाणेच वरुणने प्रभासच्या पाठीत तलवार खुपसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वरुणने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याला कॅप्शन दिलेय की, जगाच्या इतिहासात केवळ दोनच व्यक्ती असं काही करु शकतात. एक म्हणजे कटप्पा आणि दुसरा व्यक्ती म्हणजे मी. प्रभास हा जमिनीवर पाय असलेला एक चांगला व्यक्ती आहे.

PHOTO : प्रभासचं आधार कार्ड पाहिलंत का?

‘बाहुबली २’ च्या अभूतपूर्व यशामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या प्रभासने नुकतेच करणच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे वृत्त ही केवळ अफवा असल्याचे म्हटले. पण, त्याने हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचेही म्हटले नाही. तो म्हणाला की, सध्या तरी असं काही ठरलं नसून ही चांगली कल्पना आहे. इतकी वर्ष राजामौली आणि करणसोबत काम केल्याने त्यांच्यासोबत पुन्हा काम करणं म्हणजे माझ्यासाठी घरातल्या व्यक्तीसोबतच काम करण्यासारख आहे.

प्रभास करणच्या पार्टीत गेल्यामुळे या दोघांनी यावर्षातील प्रोजेक्टविषयी नक्कीच काहीतरी चर्चा केली असेल असे म्हटले जातेय.