दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही गाजलेल्या कलाकारांमध्ये चर्चेत असणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि अभिनेता प्रभास यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या निमित्ताने आणि हिंदीतही प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिवसेंदिवस या दोघांच्याही चाहत्यांचा आकडा वाढत आहे. अनुष्का आणि प्रभास यांची लोकप्रियता आणखी एका गोष्टीमुळे वाढलीय. ती गोष्ट म्हणजे त्या दोघांचे खासगी आयुष्य. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगल्याचे पाहायल मिळाले. ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडीच्या नात्याविषयी आणखी एक गोष्टी सर्वांसमोर आली आहे.

‘बॉलिवूड लाईफ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सध्याच्या घडीला अनुष्का आणि प्रभासच्या नात्याचे बंध आणखीनच दृढ झाले असून ती प्रभाससोबत खऱ्या गर्लफ्रेंडप्रमाणे वागू लागली आहे. जेव्हा जेव्हा अनुष्का आणि प्रभास एकत्र असतात आणि त्याला कोणाचा फोन येतो, तेव्हा तेव्हा त्याला नेमका कोणाचा फोन येतो यावर तिचे लक्ष असते. तिचे हे असे वागणे सध्या अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

वाचा : पिसाळलेल्या कुत्र्यांना मारायलाच पाहिजे: शरद पोंक्षे

प्रभास आणि अनुष्का या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. किंबहुना प्रभासच्या कुटुंबियांनी त्याच्यासाठी वधू शोधण्यास सुरुवात केल्याचेही म्हटले जात होते. पण, त्यातील कोणत्याच वृत्ताला ‘बाहुबली’ प्रभासने दुजोरा दिला नाही. पण, अनुष्का आणि प्रभासचे नाते दरदिवशी आणखीन खुलत असल्याचे कळत आहे. तेव्हा आता येत्या काळात हे दोघंही त्यांच्या नात्याविषयी कोणती अधिकृत घोषणा करतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.