‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेनंतर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जेनिफर विंगेटला काही टीव्ही शोचे सूत्रसंचालन करताना पाहिले गेले. त्यानंतर सोनी टीव्हीवरील ‘बेहद’ या मालिकेत मायाची भूमिका साकारताना जेनिफर दिसली. या मालिकेतील आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. जेनिफरचे नाव ट्विटरवरही ट्रेण्ड होऊ लागले. यावरूनच तिचे चाहते तिला किती पसंत करतात याची प्रचिती येते. तिच्यामुळेच मालिकेचा टीआरपीही वाढू लागला.

या वाढत्या प्रसिद्धीमुळेच जेनिफरने आपले मानधन वाढवल्याची माहिती समोर येतेय. छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींमध्ये जेनिफर सर्वांधिक मानधन घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे. एका एपिसोडसाठी ती एक लाख रुपये मानधन घेत असून याआधी ती ८० ते ८५ हजार रुपये घेत होती.

वाचा : ‘इंदू सरकार’मधून एकही शब्द हटवणार नाही: मधुर भांडारकर

जेनिफरच्या वाढत्या लोकप्रियतेला पाहता इतर अनेक वाहिन्यांकडून आणि निर्मिती संस्थांकडून तिला ऑफर येत असल्याचीही माहिती आहे. अशा वेळी जेनिफरने ‘बेहद’ मालिका सोडू नये यासाठी निर्मात्यांनीही तिला वाढीव मानधन देण्यास मान्य झाले. याआधी स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अभिनेत्री हिना खानलाही एका एपिसोडसाठी १ लाख रुपये मानधन मिळायचे.

View this post on Instagram

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.